2020 पर्यंत देशात एटीएम,डेबिट आणि क्रेडिट कार्ड कालबाह्य होणार - नीती आयोग

By admin | Published: January 8, 2017 12:10 PM2017-01-08T12:10:41+5:302017-01-08T12:10:41+5:30

नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशिन 2020 पर्यंत देशात कालबाह्य होतील असं म्हटलं

By 2020 ATM, debit and credit card will expire in the country - Niti Commission | 2020 पर्यंत देशात एटीएम,डेबिट आणि क्रेडिट कार्ड कालबाह्य होणार - नीती आयोग

2020 पर्यंत देशात एटीएम,डेबिट आणि क्रेडिट कार्ड कालबाह्य होणार - नीती आयोग

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - नोटाबंदीनंतर देशात कॅशलेस व्यवहारांना चालना देण्याचे प्रयत्न सुरू असताना नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड, एटीएम आणि पीओएस मशिन 2020 पर्यंत देशात कालबाह्य होतील असं म्हटलं आहे.  
 
कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी नीती आयोगाने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. अर्थविषयक तंत्रज्ञान सामाजिक अविष्कार या बाबतीत भारतात मोठे बदल होत आहेत. या बदलामुळेच भारतात येत्या काळात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम मशीन आणि पीओएस मशीनची गरज उरणार नाही असे अमिताभ कांत यांनी म्हटले. प्रवासी भारतीय संमेलन 2017 या कार्यक्रमात ते बोलत होते.  हा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे. 
 
आपला देश एकमेव असा देश आहे की जेथे १ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात आणि त्यांच्याजवळ बायोमेट्रिक ओळख आहे. मोबाईल फोन आणि भीम अॅपच्या साहाय्याने आपण भविष्यात सर्व व्यवहार करू शकू असे ते म्हणाले. 

Web Title: By 2020 ATM, debit and credit card will expire in the country - Niti Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.