'2029 पर्यंत नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहणार, त्यांची बरोबरी करण्यास कुणीही सक्षम नाही!'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2018 10:23 AM2018-03-20T10:23:50+5:302018-03-20T16:21:18+5:30
सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या नेत्यांमध्ये मोदी सहाव्या स्थानावर
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामधील एनडीए सरकारचा चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. पुढील वर्षी 2019मध्ये लोकसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच विरोधी पक्षाने याची तयारी सुरु केली आहे, त्याचप्रमाणे पुन्हा सत्तेत येण्यासाठी भाजपा आपली ताकद पणाला लावणार. तर विरोधक सत्ता मिळवण्यासाठी तयारीला लागले आहेत.
सध्या मोदी सरकारला प्रत्येक प्रश्न आणि निर्णयावर घेरलं जात आहे. सध्या एनडीएचे मित्रपक्ष नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळं मोदी सरकार अडचणीत सापडले आहे. त्यातच नरेंद्र मोदींसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ब्लूमबर्ग मीडिया समूहाने जगभरातल 16 देशांमध्ये एक सर्वेक्षण केले आहे. त्यामध्ये त्यांनी असा अंदाज लावला आहे की 2029 पर्यंत मोदी सत्तेत राहतील. सर्वाधिक काळ सत्तेत राहणाऱ्या नेत्यांमध्ये मोदी सहाव्या स्थानावर असतील असेही त्यांनी यामध्ये स्पष्ट केलं आहे.
2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्धी एवढी होती की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्यांची बरोबरी कोणताही नेता करु शकणार नाही असेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. ब्लूमबर्ग मीडियाच्या रिपोर्टनुसार, 2029 पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता उपभोगणार आहेत. 2014 मध्ये त्यांनी केलेल्या कामगिरीमुळं विरोधक तुटले आहेत. लोकांमध्ये त्यांची लोकप्रियता वाढतच चालली आहे. त्यांचे ही लोकप्रियता पाहता 2019मध्येही मोदी सरकार सत्तेत येणार आहे. 2019 आणि 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत ही पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयी होतील असाे ब्लूमबर्ग मीडियाने रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
सध्याच्या चार वर्षाच्या कार्यकाळामध्ये मोदी यांनी मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळं भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढल्याचे ब्लूमबर्ग मीडियाने रिपोर्टमध्ये सांगितले आहे. 2019मध्ये मोदी पुन्हा सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा काही धाडसी निर्णय घेण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. आगामी काळात त्यांच्या लोकप्रियेतमध्ये आणखी वाढ होणार आहे. त्याबळावर 2024मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीतही ते विजयी होतील आणि सत्ता स्थापन करतील असा रिपोर्ट ब्लूमबर्ग मीडियाने दिला आहे.