दिवाळखोरीतून फिनिक्स झेप घेणारी स्पाईस जेट विकत घेणार 205 विमाने

By admin | Published: January 13, 2017 04:32 PM2017-01-13T16:32:21+5:302017-01-13T16:32:21+5:30

स्पाईस जेट बंद होण्याच्या मार्गावर असताना अजय सिंह यांनी कंपनीचे नेतृत्व स्वीकारले आणि कंपनीला नफ्यात आणले.

205 planes to purchase Phoenix leaping Spice Jet from bankruptcy | दिवाळखोरीतून फिनिक्स झेप घेणारी स्पाईस जेट विकत घेणार 205 विमाने

दिवाळखोरीतून फिनिक्स झेप घेणारी स्पाईस जेट विकत घेणार 205 विमाने

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 13 - दिवाळखोरीच्या उंबरठयावरुन फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेणा-या स्पाईस जेट या भारतीय विमान कंपनीने बोईंगकडे विमान खरेदीची सर्वात मोठी ऑर्डर नोंदवली. स्पाईस जेट बोईंगकडून एकूण 205 विमाने विकत घेणार आहे. हा सर्व व्यवहार 1.5 लाख कोटी रुपयांचा आहे. 
 
स्पाईस जेट बंद होण्याच्या मार्गावर असताना अजय सिंह यांनी कंपनीचे नेतृत्व स्वीकारले आणि कंपनीला नफ्यात आणले. आमच्या कंपनीची जी यशोगाथा आहे तशी आज जगात फार कमी उदहारणे आहेत. स्पाईस जेटने सलग सात तिमाहीत नफा कमावला. वेळेवर सेवा देण्याबरोबरच बुक झालेली तिकीटे रद्द होण्याचे प्रमाणही कमी आहे असे अजय सिंह यांनी सांगितले. 
 
भारतात बोईंगच्या व्यवसाय वाढीसाठी स्पाईस जेटबरोबर करार महत्वाचा होता. बोईंगची स्पर्धक असलेल्या एअरबसला इंडिगो एअरलाईन्सकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. सध्या जगामध्ये भारत ही वेगाने वाढणारी हवाई बाजारपेठ असून इथे विमानांची निर्मिती करणा-या कंपन्यांच्या विकासालाही वाव आहे. स्वस्त हवाई तिकीटांमुळे वर्षाला भारतात हवाई प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या 20 टक्क्याने वाढत आहे. 
 
 

Web Title: 205 planes to purchase Phoenix leaping Spice Jet from bankruptcy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.