तस्करीचे २१ किलो सोने जप्त, दोन विदेशींसह तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2019 06:02 AM2019-11-08T06:02:38+5:302019-11-08T06:02:54+5:30

अटक झालेल्यांत एक तैवानचाही नागरिक आहे, असे डीआरआयने गुरुवारी निवेदनात म्हटले.

21 kg of smuggled gold seized, three foreigners arrested | तस्करीचे २१ किलो सोने जप्त, दोन विदेशींसह तिघांना अटक

तस्करीचे २१ किलो सोने जप्त, दोन विदेशींसह तिघांना अटक

Next

नवी दिल्ली : तैवान आणि हाँगकाँग येथून भारतात होत असलेल्या सोन्याच्या तस्करीत गुंतलेल्या टोळीतील तीन जणांना महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक करून २१ किलो सोने जप्त केले. त्यात एक चिनी नागरिक असून, तो या टोळीच्या प्रमुखांपैकी एक असल्याचा संशय आहे.

अटक झालेल्यांत एक तैवानचाही नागरिक आहे, असे डीआरआयने गुरुवारी निवेदनात म्हटले. प्राथमिक चौकशीत भारतात होत असलेल्या या तस्करीमध्ये चीन व तैवानस्थित टोळी स्वतंत्रपणे गुंतली असल्याचे दिसते. हे सोने भांडी आणि इतर घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये दडवून आणले जात होते. तैवानस्थित टोळीने सोने आरओ वॉटर प्युरिफायर्सच्या सेडिमेंट (गाळ) फिल्टर्समध्ये लपवून आणले. हे प्युरिफायर्स तैवानहून नवी दिल्लीला कुरिअरने पाठवले गेले आणि टोळीच्या सदस्यांनी ते घेतले. नंतर हे सोने सेडिमेंट फिल्टरमधून री-मेल्टिंग प्रक्रियेतून वेगळे करण्यात आले, असे त्यात म्हटले आहे. हे मिळवण्यात आलेले सोने करोल बागेतील सराफांना विकले गेले. या सराफांचीही चौकशी केली जात आहे. याप्रकरणी डीआरआयने २१ आॅक्टोबर रोजी दिल्लीतील उच्चभ्रू सोसायटीतून ७.६२ कोटी रुपयांचे तस्करी झालेले २१ किलो सोने जप्त केले. भारतीय आणि तैवानचा नागरिक असे दोघे हे तस्करीचे सोने घ्यायला आले असताना त्यांना अटक झाली.

Web Title: 21 kg of smuggled gold seized, three foreigners arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.