केरळमधून २१ बेपत्ता

By admin | Published: July 12, 2016 12:51 AM2016-07-12T00:51:24+5:302016-07-12T00:51:24+5:30

केरळमधील काही युवकांचा गट अतिरेकी संघटना आयएसमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्यातून २१ जण बेपत्ता झाले आहेत

21 missing from Kerala | केरळमधून २१ बेपत्ता

केरळमधून २१ बेपत्ता

Next


तिरुवअनंतपुरम : केरळमधील काही युवकांचा गट अतिरेकी संघटना आयएसमध्ये सामील झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर राज्यातून २१ जण बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी विधानसभेत दिली.
विरोधी नेते रमेश चेन्निथला यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कासरगोड येथून १७, तर पलक्कड येथून ४ युवक बेपत्ता झाले आहेत. दहशतवाद किंवा कट्टरपथीयांना कोणताही धर्म नसतो. या मुद्यावर सरकार समाजातील मुस्लिमविरोधी भावना भडकावण्याची कोणालाही परवानगी देणार नाही.
कासरगोड येथून बेपत्ता झालेल्यांमध्ये चार महिला व तीन मुले आहेत. पलक्कड येथून बेपत्ता झालेल्यांमध्ये दोन महिला आहेत. हे लोक वेगवेगळी कारणे दाखवून घरांतून बेपत्ता झाले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हे लोक सिरिया व अफगाणिस्तानमध्ये गेले आहेत व ते आयएसच्या शिबिरांमध्ये राहत आहेत. या प्रकरणाशी संबंधित कासरगोडच्या एका युवकाला मुंबई विमानतळावर ताब्यात घेतले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 21 missing from Kerala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.