कोकण रेल्वेमार्गावर होणार नवीन 21 स्थानके !

By admin | Published: June 8, 2017 01:44 PM2017-06-08T13:44:15+5:302017-06-08T13:44:15+5:30

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) कोकण रेल्वे मार्गावर 21 नवीन स्थानके आणि 147 किलोमीटर लांब मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना आखत आहे.

21 new stations to be commissioned on Konkan Railway route | कोकण रेल्वेमार्गावर होणार नवीन 21 स्थानके !

कोकण रेल्वेमार्गावर होणार नवीन 21 स्थानके !

Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 08 - कोकण रेल्वेने प्रवास करणा-या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. आता कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांची संख्या वाढविण्यात येणार आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (केआरसीएल) कोकण रेल्वे मार्गावर 21 नवीन स्थानके आणि 147 किलोमीटर लांब मार्गाचे दुपदरीकरण करण्याची योजना आखत आहे.  
कोकण रेल्वेचे कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापक (धोरणात्मक नियोजन आणि व्यवसाय विकास) जोसेफ जॉर्ज यांनी पत्रकारांना सांगितले की, नवीन योजणांनुसार कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाच्या ठिकाणी 21 नवी स्थानके बनविण्यात येणार आहेत. यामुळे या मार्गावर एकूण 87 स्थानके होतील आणि दोन स्थानकांमधील 12.75 किलोमीटरचे अंतर कमी होऊन 8.3 किलोमीटर इतके होईल, असे जॉर्ज म्हणाले.
याचबरोबर, या मार्गावरील 147 किलोमीटरचा दुपदरीकरणासाठी आणि अत्याधुनिक योजनांसाठी 3,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  तसेच, या मार्गावर 1,110 कोटी रुपये खर्च करुन विद्युतीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आल्याचेही जॉर्ज यांनी सांगितले. 
 

Web Title: 21 new stations to be commissioned on Konkan Railway route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.