रेणापूर कृउबासाठीचे २१ नामांकनपत्रे अवैध
By Admin | Published: August 3, 2015 10:26 PM2015-08-03T22:26:50+5:302015-08-03T22:26:50+5:30
रेणापूर : रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक होत असून, शनिवारी प्राप्त ९८ उमेदवारी अर्जांची छाननी झाली असता त्यात २१ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ७७ अर्ज आहेत.
र णापूर : रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक होत असून, शनिवारी प्राप्त ९८ उमेदवारी अर्जांची छाननी झाली असता त्यात २१ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ७७ अर्ज आहेत. रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १७ संचालकांच्या निवडीसाठी ३० ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ९८ नामांकनपत्रे दाखल झाली होती. शनिवारी या नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली असता, २१ अर्ज अवैध ठरले. यात गुलाब जाधव, दशरथ पवार, गोरोबा जाधव, दशरथ मुंडे, अश्रुबा चोरमले, सुग्रीव भुरे, उमाकांत खलंग्रे, अशोक शेळके, कोंडाबाई जाधव, विलास चक्रे, शाम पिनाटे, विष्णुदास जाधव, भास्कर दहिफळे, गोविंद चव्हाण, दादाराव कांबळे, रंजना गालफाडे, सुग्रीव कांबळे, शाम कसपटे, राजाभाऊ रायनुळे, शास्त्री चव्हाण, दत्तात्रय बुड्डे यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी ३ ते ५ ऑगस्ट असा आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी व्ही.एम. पोतंगले यांनी दिली. ५ ऑगस्टनंतर रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. (वार्ताहर)