काँग्रेसचे २१ प्रवक्ते, ३१ मीडिया पॅनलिस्ट नियुक्त
By Admin | Published: March 25, 2015 01:46 AM2015-03-25T01:46:58+5:302015-03-25T01:46:58+5:30
काँग्रेसने मंगळवारी पक्ष संघटनेत मोठा खांदेपालट करीत ४ वरिष्ठ प्रवक्ते, १७ प्रवक्ते आणि ३१ मीडिया पॅनलिस्टची यादी घोषित केली.
नबिन सिन्हा ल्ल नवी दिल्ली
काँग्रेसने मंगळवारी पक्ष संघटनेत मोठा खांदेपालट करीत ४ वरिष्ठ प्रवक्ते, १७ प्रवक्ते आणि ३१ मीडिया पॅनलिस्टची यादी घोषित केली. अजय माकन, सी. पी. जोशी, सत्यव्रत चतुर्वेदी आणि शकील अहमद यांना वरिष्ठ प्रवक्ते म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. टीव्हीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या ३१ पॅनलिस्टच्या यादीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनाही स्थान केण्यात आले आहे. या नव्या चमूमध्ये महाराष्ट्रातील १० नेत्यांचा समावेश असणार आहे.
काँग्रेसने ४ वरिष्ठांसोबतच अन्य १७ प्रवक्ते नियुक्त केले. त्यात अभिनेत्री खुशबू यांचा समावेश आहे. आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, मुकुल वासनिक, पी. चिदंबरम आणि सलमान खुर्शिद हे पाच नेते आधीपासूनच वरिष्ठ प्रवक्ते आहेत. मीडिया विभागाचे प्रमुख या नात्याने रणदीप सिंग सुरजेवाला हे या प्रवक्त्यांच्या चमूचे नेतृत्व करतील. या नव्या नियक्ुतीमुळे आता काँग्रेसमधील प्रवक्त्यांची संख्या ३६ झाली आहे.
महाराष्ट्रातील राजीव सातव, प्रियंका चतुर्वेदी आणि रजनी पाटील यांचा समावेश आहे तर नव्या मीडिया पॅनलिस्टमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे, दिवंगत विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख, अनंत गाडगीळ, भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई आणि संजय निरुपम यांचा समावेश आहे. खासदार रेणुका चौधरी यांना मात्र डच्चू दिला आहे.