देशात २१ विद्यापीठे बोगस
By admin | Published: October 8, 2014 04:03 AM2014-10-08T04:03:37+5:302014-10-08T04:03:37+5:30
देशातील २१ विद्यापीठे बनावट असल्याची माहिती केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नुकतीच जाहीर केली आहे.
मुंबई : देशातील २१ विद्यापीठे बनावट असल्याची माहिती केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नुकतीच जाहीर केली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील सर्वाधिक म्हणजे नऊ विद्यापीठांचा समावेश असून, त्यामध्ये नोएडा, खोडा आदी विद्यापीठांचा समावेश आहे. तसेच यामध्ये राज्यातील नागपूरच्या राजा अरेबिक या विद्यापीठाचाही समावेश आहे.
यूजीसीमार्फत दरवर्षी देशातील विद्यापीठांचा आढावा घेऊन त्यांची छाननी करण्यात येते. या छाननीनंतर विद्यापीठ अनुदान आयोग कायदा १९५६नुसार बोगस विद्यापीठांची यादी यूजीसीने संकेतस्थळावर जारी केली आहे. यामध्ये खोडा येथील इंद्रप्रस्थ शिक्षा परिषद, माकनपूर, नोएडा यांसारख्या अनेक नामांकित विद्यापीठांचा समावेश आहे. त्यामुळे या विद्यापीठांच्या पदव्याही बनावट ठरणार असल्याने या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यूजीसीच्या यादीत सर्वाधिक विद्यापीठे उत्तर प्रदेशातील आहेत. (प्रतिनिधी)