२१ वर्षांनी सियाचिनमध्ये सापडला जवान तुकाराम पाटीलचा मृतदेह

By Admin | Published: October 18, 2014 01:39 PM2014-10-18T13:39:49+5:302014-10-18T14:00:41+5:30

सियाचीनमधील बर्फाळ प्रदेशात मृत्यूमुखी पडलेल्या तुकाराम पाटील या जवानाचा मृतदेह तब्बल २१ वर्षांनी सापडला आहे.

21-year-old Tukaram Patil's body found in Siachen | २१ वर्षांनी सियाचिनमध्ये सापडला जवान तुकाराम पाटीलचा मृतदेह

२१ वर्षांनी सियाचिनमध्ये सापडला जवान तुकाराम पाटीलचा मृतदेह

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १८ -सियाचीनमधील बर्फाळ प्रदेशात मृत्यूमुखी पडलेल्या तुकाराम पाटील या जवानाच्या मृतदेहाचे अवशेष तब्बल २१ वर्षांनी सापडले आहेत. सांगलीतील जिल्ह्यातील रहिवासी असणा-या हवालदार तुकाराम यांचा फेब्रुवारी १९९३ साली मृत्यू झाला होता. 
पाटील फेब्रुवारी महिन्यात इतर जवानांसह सियाचीनमध्ये गस्त घालत असताना एका हिमदरीत पडले आणि बेपत्ता झाले. लष्करातर्फे अनेक वर्ष त्यांचा शोध घेण्यात आला, मात्र त्यांचा मृतदेह सापडला नाही. मात्र या आठवड्यात काही जवानांना गस्त घालत त्यांचे अवशेष सापडले. खिशातील कुटुंबियांची चिठ्ठी आणि वैद्यकीय प्रमाणपत्रामुळे त्यांची ओळख पटू शकली. 
हेलिकॉप्टरमधून वाटण्यात येणारी फूड पॅकेट्स गोळा करताना ते हिमदरीत पडले, त्यांच्या सहका-यांनी त्यांना पकडून वर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले व पाटील खोल दरीत कोसळले. पाटील यांचा लहान भाऊही १९८७ साली सियाचीनमध्ये बेपत्ता झाला होता, मात्र त्यांचा शोध अद्यापही लागलेला नाही.  
 
 

 

Web Title: 21-year-old Tukaram Patil's body found in Siachen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.