भादली येथे क्षुल्लक कारणावरुन दंगल २२जणांवर गुन्हा दाखल

By admin | Published: March 15, 2016 02:02 AM2016-03-15T02:02:02+5:302016-03-15T02:02:02+5:30

नशिराबाद- भादली ता.जळगाव येथे घरासमोर गव्हाने भरलेेले ट्रॅक्टर का लावले या क्षुल्लक कारणावरुन दंगल होऊन २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत नयना श्रीकांत ढाके (२४) भादली (खडसेवाडा) यांनी फिर्याद दिली आहे घटनेमुळे भादलीत तणावपूर्ण वातावरण होते. जमावाने वाहनांची मोडतोड करुन हजारो रुपयांचे नुकसान केले. आपआपसात हाणामारी झाल्याने काहीजण जखमी झाले तर काहींनी अश्लील शिविगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

22 cases of rioting have been registered by Bhadli for minor reasons | भादली येथे क्षुल्लक कारणावरुन दंगल २२जणांवर गुन्हा दाखल

भादली येथे क्षुल्लक कारणावरुन दंगल २२जणांवर गुन्हा दाखल

Next
िराबाद- भादली ता.जळगाव येथे घरासमोर गव्हाने भरलेेले ट्रॅक्टर का लावले या क्षुल्लक कारणावरुन दंगल होऊन २२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत नयना श्रीकांत ढाके (२४) भादली (खडसेवाडा) यांनी फिर्याद दिली आहे घटनेमुळे भादलीत तणावपूर्ण वातावरण होते. जमावाने वाहनांची मोडतोड करुन हजारो रुपयांचे नुकसान केले. आपआपसात हाणामारी झाल्याने काहीजण जखमी झाले तर काहींनी अश्लील शिविगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
भादली येथे खडसेवाड्यात शेतातून गव्हाचे पोते अंगणात ठेवत असताना सुरेश रामा खडसे व त्याचे कुटुंबियांनी ढाके परिवाराला हटकले व शिविगाळ केली. त्यावरुन हाणामारीची ठिणगी पडली व दोनगटात वाद उफाळला. त्यामुळे तणाव निर्माण झाला. या प्रकरणी सुरेश रामा खडसे, दीपक प्रेमचंद खडसे,छगन केशव खडसे, हितेश छगन खडसे, चेतन छगन खडसे, मनोज बाळू खडसे, वासुदेव रघुनाथ रडे, किरण भोजराज कोल्हे, ज्ञानदेव पंडीत खडसे, प्रभाकर आत्माराम खडसे, वर्षा किरण कोल्हे, प्रतिभा वासुदेव रडे, सुनंदा सुरेश खडसे, प्रकाश पाटील टेलर, मोहन ललीत खडसे, राकेश विष्णू खडसे, चेतन महाजन, सुनंदा दत्तू खडसे, विकास रघुनाथ रडे, चंद्रकांत रघुनाथ रडे, जरशा वसंत पाटील, अशोक सुका खडसे.
यासर्वार्ंना एकत्रितपणे घरात घुसून मारहाण केली व घराबाहेर ओढले. घरातील सामानाची मोडतोड केली. याबाबत गुन्हा रात्री उशीरापर्यंत दाखल करण्याचे व आरोपींना धरपकड सत्र सुरू होते.
भादली येथेे पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. ही घटना सायंकाळी ६ ला झाला.
दुसर्‍या गटाची तक्रार देण्याची कार्यवाही मध्यरात्रीपर्यंत सुरूच होती.

Web Title: 22 cases of rioting have been registered by Bhadli for minor reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.