दोन अपघातांत २२ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 05:12 AM2018-04-29T05:12:58+5:302018-04-29T05:12:58+5:30
उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात झालेल्या दोन अपघातांत एकूण २२ जण मरण पावले असून, त्यात एका लग्नाच्या वºहाडातील सहा जणांचा समावेश आहे.
लखीमपूर खेरी/सतना : उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात झालेल्या दोन अपघातांत एकूण २२ जण मरण पावले असून, त्यात एका लग्नाच्या वºहाडातील सहा जणांचा समावेश आहे. नवरी मुलगीही अपघातात मरण पावली आहे. या दोन्ही अपघातांमुळे ड्रायव्हरचा हलगर्जीपणा व वाहने बेदरकारपणे चालवणे, हा प्रश्न समोर आला आहे.
उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर उचौलिया गावी एक व्हॅन ट्रकवर आदळल्याने १६ प्रवासी जागीच ठार झाले. व्हॅनचा ड्रायव्हर व हेल्पर यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. या अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळेच हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. तो वाहन खूपच वेगाने चालवत होता आणि त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन एका ट्रकवर जाऊ न आदळली.
मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात लग्नाचे वºहाडी ज्या कारने जात होते, त्या कारवर मागून येणारा ट्रक आदळला आणि कारमधील सहा जण जागीच मरण पावले. सतना जिल्ह्याच्या नरोरा गावापाशी हा अपघात झाला. मृतांमध्ये नवरी मुलगी व ड्रायव्हर यांचा समावेश आहे. दोन जखमी मुलींवर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, ट्रक इतक्या जोरात कारवर आदळला की कारचा मागील भाग ट्रकच्या आत अडकून बसला. जेसीबीच्या साह्याने कार व ट्रक वेगळे करण्यात आले. मृतांमध्ये चार लहान मुली आहेत. (वृत्तसंस्था)