राजस्थानात २२ आमदार झाले मंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 09:12 AM2023-12-31T09:12:48+5:302023-12-31T09:13:04+5:30
मंत्री करण्यात आलेल्यांत करणपूर येथून निवडणूक लढवणारे सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचाही समावेश आहे. या जागेसाठी ५ जानेवारीला मतदान आहे. काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांच्या निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
जयपूर : राजस्थानमधील सत्ताधारी भाजपच्या २१ आमदारांसह २२ जणांनी शनिवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. १२ जणांना कॅबिनेट मंत्री, पाचजणांना राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि पाचजणांना राज्यमंत्री करण्यात आले आहे.
कॅबिनेट मंत्र्यांमध्ये डॉ. किरोडी लाल मीना, गजेंद्रसिंह खिंवसर, राजवर्धनसिंह राठोड, बाबुलाल खराडी, मदन दिलावर, जोगाराम पटेल, सुरेशसिंह रावत, अविनाश गेहलोत, जोराराम कुमावत, हेमंत मीना, कन्हैयालाल चौधरी आणि सुमित गोदारा यांचा समावेश आहे, तर संजय शर्मा, गौतम कुमार, झाबर सिंह खर्रा, सुरेंद्रपाल सिंह टीटी व हिरालाल नागर यांनी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून शपथ घेतली आहे.
याशिवाय आमदार ओटाराम देवासी, डॉ. मंजू बाघमार, विजय सिंह चौधरी, के. के. बिश्नोई आणि जवाहर सिंह बेढम यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मंत्री करण्यात आलेल्यांत करणपूर येथून निवडणूक लढवणारे सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचाही समावेश आहे. या जागेसाठी ५ जानेवारीला मतदान आहे. काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांच्या निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.