धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 09:57 AM2024-10-09T09:57:04+5:302024-10-09T09:58:31+5:30

बनावट कागदपत्रांचा वापर करुन २२ पाकिस्तानी भारतात राहत होती अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

22 Pakistanis used to live in Hindu names one who forged documents was also arrested | धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत

धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत

२२ पाकिस्तानी नागरिक बनावट कागदपत्रे बनवून राहायत होते, असा धक्कादायक खुलासा झालाय. या प्रकरणी बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्याला कर्नाटकपोलिसांनी बंगळुरु येथून ताब्यात घेतलंय. 

या सर्व २२ पाकिस्तानी नागरिकांनी आपली खरी ओळख लपवून हिंदू नावांचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी अलीकडेच बेंगळुरूच्या बाहेरील जिगानी येथून एकाच कुटुंबातील ४ जणांना अटक केली होती. हे सर्व पाकिस्तानी नागरिक असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. 

कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा

अटकेनंतर या लोकांची चौकशी करण्यात आली. पोलिसांनी पेन्या परिसरातून आणखी ३ पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली. काही पाकिस्तानीही दावणगेरेमध्ये राहत आहेत. हे लोक खोट्या नावानेही येथे राहत असल्याचे सांगण्यात आले. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी,  परवेझ नावाचा एक व्यक्ती या पाकिस्तानींना त्यांच्या बदललेल्या नावांसह आवश्यक ती सर्व कागदपत्रे मिळविण्यात मदत करत असल्याचे आढळून आले. परवेझला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याने २२ पाकिस्तानी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करण्यास मदत केली असावी. त्याची चौकशी करण्यात येत आहे. सध्या तपास सुरू आहे. 

परवेज हा मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. तो आधी मुंबईत राहत होता. हिंदू अस्मितेच्या आधारे भारतात स्थायिक होण्यासाठी त्याने कथितपणे ५ कुटुंबांना मदत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्याने इतर परदेशी नागरिकांनाही मुंबई आणि दिल्लीसारख्या शहरात स्थायिक होण्यास मदत केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. 

या प्रकरणी पोलिसांनी चौकशी वाढवली आहे. त्याने याआधीही अनेक परदेशी लोकांना भारतात राहण्यासाठी मदत केली होती का? याची चौकशी पोलिस करत आहेत. 

Web Title: 22 Pakistanis used to live in Hindu names one who forged documents was also arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.