मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील अपघातांत २२ जण ठार

By admin | Published: April 15, 2016 08:36 PM2016-04-15T20:36:14+5:302016-04-15T20:36:14+5:30

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे शुक्रवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातांत २२ जण ठार आणि २० जण जखमी झाले. मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातील घोंसला गावाजवळ एक डम्पर आणि जीप यांच्यात

22 people were killed in accidents in Madhya Pradesh and Chhattisgarh | मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील अपघातांत २२ जण ठार

मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील अपघातांत २२ जण ठार

Next

ऑनलाइन लोकमत

इंदूर, दि. १५ -  मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे शुक्रवारी घडलेल्या दोन वेगवेगळ्या रस्ता अपघातांत २२ जण ठार आणि २० जण जखमी झाले. मध्य प्रदेशच्या उज्जैन जिल्ह्यातील घोंसला गावाजवळ एक डम्पर आणि जीप यांच्यात समोरासमोर टक्कर होऊन जीपमध्ये बसलेल्या एकाच कुटुंबातील ११ सदस्यांसह १२ जण ठार झाले.

महिदपूर येथील बाबुलाल पालीवाल यांच्या कुटुंबातील ११ जण जीपने उज्जैन येथील सिंहस्थ कुंभ मेळ्यासाठी जात होते. दुपारी ३ वाजता त्यांची जीप समोरून येणाऱ्या डम्परवर आदळली, ज्यात पालीवाल कुटुंबातील सर्व ११ सदस्य व जीप चालक असे १२ जण जागीच ठार झाले. दुसरा अपघात छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील अंतागडजवळ घडला.

एक अनियंत्रित मिनी बस रस्त्याच्या कडेला उलटून त्यात ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. अन्य २० जण जखमी झाले आहेत. ही बस नारायणपूरहून येत होती. बसमध्ये ७० प्रवासी बसले होते

Web Title: 22 people were killed in accidents in Madhya Pradesh and Chhattisgarh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.