२२ रामवनवासींचा समूह नाशकात

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:31+5:302015-08-26T23:32:31+5:30

सतरा वर्षांची परंपरा : जनार्दन स्वामी आश्रमात शाही पर्वणीपर्यंत मुक्कामी

22 Ramnavans group of people in Nashik | २२ रामवनवासींचा समूह नाशकात

२२ रामवनवासींचा समूह नाशकात

Next
रा वर्षांची परंपरा : जनार्दन स्वामी आश्रमात शाही पर्वणीपर्यंत मुक्कामी
नाशिक : प्रभू रामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगावा लागला. त्यांच्या स्मृतींना उजाळा देत भावार्थरामायणाचे पठण करत राहत्या घरापासून बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वरपर्यंत चौदा दिवस उपवास करून पदयात्रेने पोहचणारा २२ रामवनवासींचा समूह मंगळवारी (दि.२५) संध्याकाळी नाशकात दाखल झाला आहे.
अहमदनगर जिल्‘ातील पाथर्डी तालुक्यातील कडगावचे २२ रामवनवासाचा अनुभव घेण्यासाठी आठवडाभरापासून घरसंसार सोडून त्र्यंबकेश्वरच्या पदयात्रेला निघाले आहेत. दरवर्षी हा रामवनवासींचा समूह पोत्यांचा पोषाख (वल्कल) परिधान करून चौदा दिवसांची पदयात्रा उपवास ठेवून पूर्ण करतात. १९९८ सालापासून ही परंपरा येथील रहिवाशांनी जोपासली आहे. त्र्यंबकेश्वर येथून ब्रšागिरी पर्वताला प्रदक्षिणा घालून चौदाव्या दिवशी हा समूह पायी परतीच्या प्रवासाला निघणार आहे.
सध्या रामवनवासींचा हा समूह तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमामध्ये थांबला असून, कुंभमेळ्याच्या पहिल्या शाहीस्नानाच्या पर्वणीपर्यंत ते मुक्कामी राहणार आहेत. त्यानंतर त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करणार असल्याचे रामवनवासींनी सांगितले. या समूहाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणाकडे काहीही न मागता स्वखर्चाने फळे व फराळाचे पदार्थ खायचे व जिथे जागा मिळेल तेथे विश्रांती घेत पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. रामवनवासींच्या दिंडीमध्ये भावार्थ रामायणाचा अर्थ सांगण्याचे काम ७२वर्षीय म्हतारदेव गीते (गुरुजी ) करत आहे.

इन्फो..............
असा आहे समूह
चौदा दिवसांच्या पदयात्रेला निघालेल्या रामवनवासींच्या समूहामध्ये महेश गिरे, सुदाम नागरे, सागर नागरे, रामदास शिरसाठ, सोपान निसाळ, वाल्मीक कोरडे, आदीनाथ शिरसाठ, सचिन पालवे, कारभारी नागरे, अंबादास नागरे, लक्ष्मण गीते, दर्शन गिरे, भगवान पालवे, तुकाराम गिते, साहेबराव शिरसाठ, पोपट गिते, रमेश कोरडे आदिंचा समावेश आहे. यामध्ये शरद कोरडे (१६) हा सर्वात कमी वयाचा असून, तो पहिल्यांदाच पदयात्रेत सहभागी झाला आहे. तो मृदंग वाद्य वाजविण्याची जबाबदारी पार पाडत आहे. तसेच रामकिसन शिरसाठ या मुक्या तरुणानेही सहभाग घेतला असून, त्याबरोबरच आदीनाथ गिते या अपंग तरुणाचाही समूहात समावेश असून तो उत्तमरीत्या भजनाचे गायन करतो.
कोट.......................
मी पंधरा वर्षांपासून दरवर्षी रामवनवासींच्या दिंडीत सहभागी होत आलो आहे. योगायोग म्हणजे बारा वर्षांपूर्वी जेव्हा माझी दुसरी वेळ होती तेव्हाही कुंभमेळ्यात नाशकात आलो आणि आताही येण्याचा योग मिळाला ही प्रभू रामचंद्रांची कृपा.
- महेश गिरे, रामवनवासी

फोटो क्र२६पीएचअेयू७२

Web Title: 22 Ramnavans group of people in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.