जम्मू-काश्मीरमध्ये 22 साईट्सवर बंदी
By admin | Published: April 26, 2017 08:52 PM2017-04-26T20:52:16+5:302017-04-26T20:57:06+5:30
म्मू - काश्मीर सरकारने हिंसाचाराला आळा घालण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसह 22 सोशल नेटवर्किंग साईट्सवर बंदी घ्यालण्याचा निर्णय घेतला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 26 - जम्मू - काश्मीर सरकारने हिंसाचाराला आळा घालण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर यांसह 22 सोशल नेटवर्किंग साईट्सवर बंदी घ्यालण्याचा निर्णय घेतला आहे.
गृह विभागाचे प्रधान सचिव आर. के. गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंडियन टेलिग्रॉफ अॅक्टनुसार 22 वेबसाईट्स आणि अॅप्लिकेशनवर बंदी घ्यालण्यात आली आहे. या सर्व सोशल साईट्सवर पुढील निर्णय घेईपर्यंत सध्या महिनाभरासाठी बंद असतील. तसेच, 3 जी आणि 4 जी मोबाईलवरील सर्व सेवा बंद करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बंदी घालण्यात आलेल्या सोशल वेबसाइट्समध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, वुईचॅट, ओझोन, गुगल प्लस, बायडू, स्काईप, व्हायबर, लाईन, स्नॅपचॅट, पिंटरेस्ट, टेलिग्राम, रेडीट, स्नॅपफीश, युट्यूब (अपलोड), व्हाईन, बझनेट, फ्लिकर अशा 22 साईट्स समावेश आहे.
गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या दगडफेकीमागे सोशल मिडीयाचा मोठा वापर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली होती. त्यामध्ये जवळपास 300 व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून दगडफेक करणा-या तरुणांना सुरक्षा दलांच्या ऑपरेशनबाबत माहिती पुरवली जाते आणि त्यानंतर त्यांना चकमक होणा-या ठिकाणी एकत्र जमवले जाते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, अशा घटनांना आळा घालण्यासाठी जम्मू - काश्मीर सरकारने हा निर्णय घेतल्याचे समजते.