बांग्लादेशात 2200 अन् पाकिस्तानात 112 प्रकरणे...शेजारील देशांमध्ये हिंदूंवर हल्ले वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2024 19:50 IST2024-12-20T19:50:21+5:302024-12-20T19:50:29+5:30

परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसभेत आकडेवारी सादर केली.

2200 cases in Bangladesh and 112 in Pakistan...Attacks on Hindus increase in neighboring countries | बांग्लादेशात 2200 अन् पाकिस्तानात 112 प्रकरणे...शेजारील देशांमध्ये हिंदूंवर हल्ले वाढले

बांग्लादेशात 2200 अन् पाकिस्तानात 112 प्रकरणे...शेजारील देशांमध्ये हिंदूंवर हल्ले वाढले

बांग्लादेशातील शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग पक्षाचे सरकार पडल्यानंतर बांग्लादेशात राहणाऱ्या हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत. इस्लामी/कट्टरपंथी मानसिकतेच्या मोहम्मद युनूस यांचे सरकार आल्यापासून तेथील हिंदूंच्या विरोधात आतापर्यंत 2200 हिंसाचाराची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. याशिवाय, पाकिस्तानमध्येही हिंदूंविरुद्ध हिंसाचाराची 112 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी ही माहिती दिली.

राज्यसभेत आकडेवारी सादर करताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आम्ही बांग्लादेश आणि पाकिस्तान, या दोन्ही देशांना पत्रे लिहून हिंदूंची सुरक्षा, कल्याण सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनानुसार, केंद्र सरकारने या घटना गांभीर्याने घेतल्या असून, बांग्लादेश सरकारकडे आपली चिंता व्यक्त केली आहे. भारताला आशा आहे की, बांगलादेश सरकार हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करेल.

पाकिस्तानबद्दल काय सांगितले

MEA च्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने पाकिस्तान सरकारलाही धार्मिक असहिष्णुता, जातीय हिंसाचार, छळ आणि अल्पसंख्याक समुदायांवर हल्ले थांबवण्याचे आवाहन केले आहे. शिवाय, त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. भारत आंतरराष्ट्रीय मंचांवर पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांची परिस्थिती प्रभावीपणे मांडत राहील.

गेल्या तीन वर्षांची आकडेवारी
MEA च्या आकडेवारीनुसार, 2022 मध्ये बांग्लादेशात हिंदूंच्या विरोधात 47 हिंसाचाराच्या घटना घडल्या, तर 2023 मध्ये 302 आणि 2024 मध्ये (8 डिसेंबर 2024 पर्यंत) ही संख्या 2200 पर्यंत वाढली  आहे. तसेच, 2022 मध्ये पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचाराचे 241 गुन्हे दाखल झाले होते, तर 2023 मध्ये 103 आणि 2024 मध्ये (ऑक्टोबरपर्यंत) 112 गुन्हे दाखल झाले आहेत. बांग्लादेश आणि पाकिस्तान व्यतिरिक्त इतर शेजारील देशात हिंदूंविरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल झालेला नाही, असेही सरकारने म्हटले आहे. 

Web Title: 2200 cases in Bangladesh and 112 in Pakistan...Attacks on Hindus increase in neighboring countries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.