ऑगस्टच्या अतिवृष्टीचा २२८ गावांना फटका, १६ हजार हेक्टरचे नुकसान
By Admin | Published: August 16, 2016 10:24 PM2016-08-16T22:24:47+5:302016-08-16T22:46:37+5:30
शासनाला प्रस्ताव सादर : शेतकर्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
शासनाला प्रस्ताव सादर : शेतकर्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा
नाशिक : जिल्ात १ ते ४ ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ातील २२८ गावांमधील ३२ हजार ९४२ शेतकर्यांच्या १६ हजार ३८५ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. तसा नुकसानभरपाईचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.
दरम्यान, शासनाला नुकसानभरपाईचा प्रस्ताव सादर केल्यानंतर आता ३२ हजार शेतकर्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा लागली आहे. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान इगतपुरी व सुरगाणा तालुक्यातील भात पिकाचे झाले आहे.
ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ात अतिवृष्टीमुळे अनेक गावांना फटका बसला होता. बागलाण तालुक्यात ३५, कळवण- ५७, नाशिक- ४२, इगतपुरी- १०, चांदवड- ४ अशा एकूण २२८ गावांमधील ३२ हजार ९४२ शेतकर्यांना फटका बसला होता. त्यात भात पिकाची सर्वाधिक लागवड झालेल्या त्र्यंबकेश्वर व सुरगाणा तालुक्यातील भात पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. त्यात सुरगाणा तालुक्यात २५ हजार २३७ शेेतकर्यांच्या ३८७६ हेक्टरवरील भात, सोयाबीन यांसह अन्य पिके मिळून सुमारे ४५२२ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच इगतपुरी तालुक्यातील १० गावांमध्ये ५ हजार २०९ शेतकर्यांच्या २६६० हेक्टर क्षेत्रावरील भात पिकाचे तसेच वरई, भाजीपालासह अन्य पिकांचे मिळून ३४०६ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले आहे. कळवण तालुक्यातील ५७ गावांमधील १५११ शेतकर्यांचे नुकसान झाले आहे. तसेच बागलाण, त्र्यंबकेश्वर, चांदवड आदि तालुक्यातही अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर केला आहे. आता शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळण्याची प्रतीक्षा आहे. (प्रतिनिधी)