Coronavirus: आता यांना कुणी सांगायचं? हिंदूराव हॉस्पिटलमधून २३ कोरोनाबाधित पळाले; दिल्लीत खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2021 06:59 PM2021-05-08T18:59:50+5:302021-05-08T19:01:01+5:30
एनडीएसीचे महापौर जय प्रकाश यांनी शनिवारी सांगितले की, उत्तर दिल्ली महानगरपालिका संचालित हिंदू राव हॉस्पिटल जे राजधानीत सर्वात मोठं हॉस्पिटल मानलं जातं.
नवी दिल्ली – देशाच्या राजधानी दिल्लीत कोरोना कहर थांबण्याची चिन्हे दिसत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याचसोबत कोरोना संक्रमण रोखण्यासाठी दिल्ली सरकार विविध उपाययोजना करत आहे. परंतु अशातच हिंदू राव हॉस्पिटलमधून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. याठिकाणी कमीत कमी २३ कोरोना बाधित रुग्ण काहीही न सांगता हॉस्पिटलमधून पळाले आहेत.
एनडीएसीचे महापौर जय प्रकाश यांनी शनिवारी सांगितले की, उत्तर दिल्ली महानगरपालिका संचालित हिंदू राव हॉस्पिटल जे राजधानीत सर्वात मोठं हॉस्पिटल मानलं जातं. या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी २५० बेड्स राखीव आहेत. दिल्ली सरकारच्या अँपनुसार, या हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नाही असं महापौरांनी सांगितले.
त्याचसोबत या हॉस्पिटलमधून २३ रुग्ण कोणालाही न कळवता १९ एप्रिल ते ६ मे दरम्यान निघून गेलेत. काही रुग्ण भरती झाल्यानंतर कोणतीही पूर्वकल्पना न देता इतरत्र चांगल्या सुविधा मिळत असल्याने निघून जातात. दिल्ली सरकारच्या हॉस्पिटलमध्ये हे होत आहे. हॉस्पिटलमधून २३ रुग्ण पळालेत ते कुठे गेलेत याची कल्पना नाही. मात्र या बाबत दिल्ली पोलिसांना सूचना दिल्याचं महापौरांनी सांगितलं आहे.
ॲडव्हान्स पैसे भरणाऱ्यांनाच दिल्लीत खासगी रुग्णालयात बेड
दिल्लीत गरीब आणि सामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात बेड मिळणे अवघड आहे. दिल्लीतील बहुतांश पंचतारांकित रुग्णालयांत रुग्णाची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याच्याकडे लाखो रुपयांचा हेल्थ इन्शुरन्स आहे का? या गोष्टी आधी तपासल्या जातात. रुग्णाला भरती केले की मग रुग्णालयाचे मीटर सुरू होते. रुग्ण वाचावा म्हणून नातेवाईकही रुग्णालयातील बिलावर आक्षेप घेत नाहीत. अनेक रुग्णांकडे हेल्थ इन्शुरन्स असला तरी त्यांना खासगी रुग्णालयात आगाऊ लाखो रुपये भरावे लागतात. शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयात याबाबत याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांना भरती करण्यासाठी लाखो रुपये मागण्यात येत आहेत. खासगी रुग्णालयांसाठी कोणतेही बंधन नसल्याची व्यथा अॅड. अभय गुप्ता यांनी सांगितली
कोरोना बळींचा आकडा 4200 समीप; चार लाखांहून अधिक रुग्ण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार (Health Ministry of India) देशात गेल्य़ा 24 तासांत देशात 4,01,078 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तर 3,18,609 बरे झाले आहेत. खळबळ उडविणारा आकडा हा मृतांचा आहे. देशात गेल्या 24 तासांत 4,187 जणांचा मृत्यू झाला आहे.