२३ पतसंस्था अडचणीतून बाहेर सहकार विभागाचे प्रयत्न : पारोळा, अमळनेर, पाचोरा तालुक्यात अनास्था

By admin | Published: November 22, 2015 12:41 AM2015-11-22T00:41:00+5:302015-11-22T00:41:00+5:30

जळगाव : जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये असुरक्षित कर्जवाटप, सहकार कायद्याचे उल्लंघन, गैरव्यवस्थापन, गैरव्यवहार तसेच कामकाजातील अनियमितपणा यामुळे अडचणीत आलेल्या १७८ पैकी २३ पतसंस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यात सहकार विभागाला यश मिळाले आहे. पारोळा, अमळनेर व पाचोरा तालुक्यात पतसंस्था चालकांची वसुलीबाबत अनास्था कायम आहे.

23 Department of Economic Affairs tried out the efforts of the cooperative department: Non-adherence to Parola, Amalner and Pachora talukas | २३ पतसंस्था अडचणीतून बाहेर सहकार विभागाचे प्रयत्न : पारोळा, अमळनेर, पाचोरा तालुक्यात अनास्था

२३ पतसंस्था अडचणीतून बाहेर सहकार विभागाचे प्रयत्न : पारोळा, अमळनेर, पाचोरा तालुक्यात अनास्था

Next
गाव : जिल्ह्यातील पतसंस्थांमध्ये असुरक्षित कर्जवाटप, सहकार कायद्याचे उल्लंघन, गैरव्यवस्थापन, गैरव्यवहार तसेच कामकाजातील अनियमितपणा यामुळे अडचणीत आलेल्या १७८ पैकी २३ पतसंस्थांना अडचणीतून बाहेर काढण्यात सहकार विभागाला यश मिळाले आहे. पारोळा, अमळनेर व पाचोरा तालुक्यात पतसंस्था चालकांची वसुलीबाबत अनास्था कायम आहे.
साहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांनी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या पतसंस्थापैकी बाहेर पडलेल्या संस्थाची यादी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला कळविली आहे.
शासन अर्थसहाय्य केले परत
ठेवीदारांची ठेवीच्या रकमेची वाढती मागणी लक्षात घेत शासनाने जळगाव जिल्ह्यातील अडचणीतील पतसंस्थांमधील अपंग, विधवा, घटस्फोटीत तसेच उपवर मुलींच्या ठेवी परत करण्यासंदर्भात निधी उपलब्ध करून दिला होता. अडचणीतून बाहेर पडलेल्या पतसंस्थांनी शासनाकडून मिळालेला निधी कर्जवसुली करीत शासनाला परत केला आहे. तसेच या पतसंस्थांसंदर्भात ठेवीदारांच्या तक्रारी देखील कमी झालेल्या आहेत. नियमित वसुली होत असल्याने या पतसंस्थेतील ठेवीदारांना आपल्या ठेवीची रक्कम मिळत असल्याचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांकडे प्राप्त झाला आहे.
जळगाव व भुसावळ तालुक्यात अनास्था
जळगाव तालुक्यातील सर्वाधिक ४७ पतसंस्था तर भुसावळ तालुक्यातील ३५ यावल तालुक्यातील ३१, रावेर तालुक्यातील २४ व पारोळा तालुक्यातील २३ पतसंस्था अडचणीत आहेत. यासार्‍यात जळगाव व भुसावळ तालुक्यातील पतसंस्थांच्या संचालकांची अनास्था दिसून आली आहे. जळगाव तालुक्यातील केवळ दोन तर भुसावळ तालुक्यातील चार पतसंस्था अडचणीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.
९ पतसंस्थाचा ठाव ठिकाणा नाही
जळगाव तालुक्यातील प्रस्तावित असलेल्या ११ पैकी ९ संस्थांची अर्थसहाय्याची परतफेड केलेली नाही. या संस्थांचा ठावठिकाणा देखील नमूद नाही. अमळनेर तालुक्यातील दोन पतसंस्थांची अर्थसहाय्याची परतफेड केलेली नसल्याचे नमूद केलेले आहे. मात्र या संस्था विलीनीकरण/ मालमत्ता विक्री केल्याने ठेवी परत करण्याचा प्रश्न मात्र मार्गी लागू शकणार आहे. तसेच भडगाव तालुक्यातील भडगाव परिसर नागरी सहकारी पतसंस्थेचे दप्तर हे पोलीस स्टेशनला जमा आहे.
(समाप्त)

Web Title: 23 Department of Economic Affairs tried out the efforts of the cooperative department: Non-adherence to Parola, Amalner and Pachora talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.