गोरखपूर तुरुंगातील २३ कैद्यांना एचआयव्ही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 01:14 AM2018-03-01T01:14:34+5:302018-03-01T01:14:34+5:30

उन्नाव जिल्ह्यातील तीन खेड्यांत ५८ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर गोरखपूर तुरुंगातही २३ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील बहुतेकजण कच्चे कैदी आहेत.

 23 prisoners in Gorakhpur jail, HIV! | गोरखपूर तुरुंगातील २३ कैद्यांना एचआयव्ही !

गोरखपूर तुरुंगातील २३ कैद्यांना एचआयव्ही !

Next

गोरखपूर : उन्नाव जिल्ह्यातील तीन खेड्यांत ५८ जण एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर गोरखपूर तुरुंगातही २३ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील बहुतेकजण कच्चे कैदी आहेत.
गेल्या काही महिन्यांत तुरूंगात घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरांतून हा प्रकार समोर आला. कैद्यांची तपासणी उत्तर प्रदेश राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या देखरेखीखाली झाली, असे गोरखपूर तुरुंगाचे अधीक्षक रामधनी मिश्रा म्हणाले. गेल्या अनेक महिन्यांत घेतलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात एका महिलेसह २३ कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळून आले. त्या सगळ््यांवर बीआरडी वैद्यकीय महाविद्यालयातील एआरटी केंद्रात उपचार सुरू आहेत व तेथेच त्यांना त्यांची सगळी औषधे व इतर वैद्यकीय मदत मिळते, असे ते म्हणाले.
रामधनी मिश्रा यांनी एचआयव्हीचा संसर्ग का झाला याचा तपशील दिला नाही. संसर्गाचा स्त्रोत कोणता हे कळणे आमच्यासाठी खूपच कठीण आहे. हे कैदी आरोग्य तपासणीत एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले एवढेच आम्ही सांगू शकतो, असे सांगितले.
तुरुंग विभागाच्या अधिकाºयांनी दिलेल्या माहितीनुसार गोरखूपर तुरुंगातील १,४०० कैद्यांची तपासणी झाली असून, आणखी ४०० कैद्यांची तपासणी केली जात आहे. महानिरीक्षक (तुरुंग) प्रमोद कुमार मिश्रा म्हणाले की, अशा संसर्गाच्या रुग्णांना शोधण्याचे काम संपूर्ण उत्तर प्रदेशमधील तुरुंगांत सुरू आहे व निष्कर्षांचा अहवाल राज्य सरकारला दिला जात आहे. या रुग्णांमध्ये चांगली आरोग्य जागरूकता वाढावी, यासाठी आम्ही तपासणी शिबिरे घेत असतो.
सीरिंजमुळे ५८ जणांना लागण झाल्याचा आरोप-
गेल्या महिन्यात बंगारमाऊ (जिल्हा उन्नाव) तहसीलअंतर्गत तीन खेड्यांतील ५८ रहिवासी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले होते. नोव्हेंबर २०१७ व गेल्या जानेवारीमध्ये घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात उघडकीस आली. हा संसर्ग बनावट डॉक्टरांनी दूषित सीरिंज वापरल्यामुळे झाल्याचा आरोप आहे.
हे रुग्ण उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभाग, नॅको (नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशन) व युपीएसएसीएसचे अधिकारी त्या वसाहतींत लोकांमध्ये आरोग्य जागृतीसाठी गेले व त्यांनी शिबिरे घेतली.

Web Title:  23 prisoners in Gorakhpur jail, HIV!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.