NEET परीक्षेत 2321 विद्यार्थ्यांना 700+ गुण; लातूर, नांदेड, अकोल्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 04:49 PM2024-07-21T16:49:21+5:302024-07-21T16:49:38+5:30

लातूर, नागपूर, नांदेड, अकोला, कोल्हापूरमधील अनेक विद्यार्थ्यांना 700+ गुण

2321 students score 700+ in NEET exam; Inclusion of students from Latur, Nanded, Akola | NEET परीक्षेत 2321 विद्यार्थ्यांना 700+ गुण; लातूर, नांदेड, अकोल्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

NEET परीक्षेत 2321 विद्यार्थ्यांना 700+ गुण; लातूर, नांदेड, अकोल्यातील विद्यार्थ्यांचा समावेश

NEET UG Result 2024 : सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने केंद्र आणि शहरांनुसार NEET UG च्या गुणांची यादी ऑनलाइन जारी केली आहेत. यंदा NEET परीक्षेत मोठा बदल झाला आहे. यापूर्वी फक्त मोठ्या कोचिंग हबमधील विद्यार्थी टॉप करायचे, पण या वर्षी देशभरातल्या 1404 केंद्रांमधून (276 शहरे आणि 25 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये) एकूण 2321 विद्यार्थ्यांनी 700+ गुण मिळवले आहेत. या आकडेवारीवरुन असे दिसून येते की, आता छोट्या शहरांतील विद्यार्थीही मेहनत घेऊन मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करत आहेत.

लातूर, नागपूर, नांदेड, अकोला, कोल्हापूरमधील विद्यार्थ्यांनी केले टॉप
हे खरंय की, कोटा, सीकर आणि कोट्टायम सारख्या प्रसिद्ध कोचिंग सेंटरमधील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे, परंतु इतर सेंटरमधील विद्यार्थीदेखील चमकले आहेत. यंदा लखनौमधील (35), कोलकाता (27), लातूर (25), नागपूर (20), फरीदाबाद (19), नांदेड (18), इंदूर (17), कटक आणि कानपूर (16-16), कोल्हापूर, नोएडा, साहिबजादा अजितसिंग नगर (14-14), आग्रा आणि अलीगढ (13-13), अकोला आणि पटियाला (10-10), दावणगेरे (8) आणि बनासकांठा (7) या शहरांमधील विद्यार्थ्यांनी 700 हून अधिक गुण मिळवून आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 

700 पेक्षा कमी गुण मिळवणारे विद्यार्थीही छोट्या शहरातील 
विशेष म्हणजे, 700 पेक्षा कमी, पण चांगले गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही छोट्या शहरातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 509 शहरे आणि 4044 केंद्रांमधील विद्यार्थ्यांनी 650 ते 699 गुण, 540 शहरे आणि 4484 केंद्रांमधील विद्यार्थ्यांनी 600 ते 649 गुण, तर 548 शहरांमधील विद्यार्थ्यांनी 550 ते 599 दरम्यान गुण मिळवले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, यातील बहुतांश विद्यार्थी लहान शहरांमधील आहेत. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला निकाल
गेल्या वर्षीच्या (NEET 2023) तुलनेत या वर्षीच आकडे बरेच चांगले आहेत. NEET 2024 च्या तुलनेत NEET 2023 चा निकाल काहीसा कमी होता. NEET 2023 मध्ये, 700 ते 720 दरम्यान गुण मिळवणारे उमेदवार 116 शहरे आणि 310 केंद्रांमधील होते. तर, 650 ते 699 दरम्यान गुण मिळवणारे उमेदवार 381 शहरे आणि 2431 केंद्रातील होते. या बदलामुळे आता केवळ मोठ्या शहरांतील विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण देशातील हुशार विद्यार्थ्यांना वैद्यकशास्त्र शिकण्याची संधी मिळत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 2321 students score 700+ in NEET exam; Inclusion of students from Latur, Nanded, Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.