मोदींनी पूर्ण केले आश्वासन, कोरोनाच्या दहशतीखाली अडकलेले 234 भारतीय देशात परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 09:28 AM2020-03-15T09:28:17+5:302020-03-15T09:33:52+5:30
या प्रवाशांना घेऊन इरानमधून विमान दिल्ली येथे पोहोचले आणि येथून पुन्हा जस्सलमेरसाठी रवाणा झाले. देशात पोहोचलेल्या या सर्व नागरिकांची लष्कराच्या विलगिकरण विभागात स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली -इराणमध्येकोरोनाच्या दहशती खाली अडकलेल्या 234 भारतीय नागरिकांना सुखरुपपणे देशात आणण्यात आले आहे. यात 131 विद्यार्थी आणि 103 तीर्थ यात्रींचा समावेश आहे, अशा माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली.
या प्रवाशांना घेऊन इरानमधून विमान दिल्ली येथे पोहोचले आणि येथून पुन्हा जस्सलमेरसाठी रवाणा झाले. देशात पोहोचलेल्या या सर्व नागरिकांची लष्कराच्या विलगिकरण विभागात स्क्रिनिंग करण्यात येणार असून त्यांना जस्सलमेरच्या क्वॅरंटाइनमध्ये ठेवण्यात येणार आहे. यापूर्वी शुक्रवारी 44 नागरिकांचा एक जथ्था इराणहूनभारतात आला होता.
234 Indians stranded in #Iran have arrived in India; including 131 students and 103 pilgrims.
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) March 14, 2020
Thank you Ambassador @dhamugaddam and @India_in_Iran team for your efforts. Thank Iranian authorities.
इराणमध्ये मृतांचा आकडा आता 700 वर -
इराणवरून 58 नागरिकांचा पहिला जथ्था मंगळवारी भारतात आला होता. इराणमध्ये शनिवारी कोरोणामुळे जवळपास 100 नागरिकांचा मृत्या झाला. याच बरोबर तेथील मृतांचा आकडा आता 700 वर पोहोचला आहे. येथे जवळपास 13 हजार लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
खोमैनी यांच्या सल्लागारांनाही कोरोनाची लागण -
इराणमधील अनेक वरिष्ठ नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एवढेच नाही, तर इराणचे सर्वोच्च नेते खोमैनी यांच्या सल्लागारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी सौदी अरेबियाने कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय विमान सेवा दोन आठ
वड्यांसाठी बंद केली होती.
All Smiles. Finally flying Home. Thank you to everyone for their efforts and making this possible. @India_in_Iran@dhamugaddam@DrSJaishankar@listenshahid@khalid_gura@mehdizafar@imranrezaansaripic.twitter.com/Fa3efCIwk3
— Muteeb Nazir (@muteeebnazir) March 14, 2020
जगभरात जवळपास 150,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर इराणमध्ये तब्बल 13,000 हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.