२३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला हजारो फुटांवर १५ मिनिटे धक्क्यावर धक्के; तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 01:12 AM2018-04-23T01:12:18+5:302018-04-23T01:12:18+5:30

एक प्रवासी जागेवरून उडाला : वैमानिकाची कमाल, दिल्लीत केले सुरक्षित लँडिंग

236 passengers on board take a 15-minute shock over thousands of feet; Three injured | २३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला हजारो फुटांवर १५ मिनिटे धक्क्यावर धक्के; तीन जखमी

२३६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाला हजारो फुटांवर १५ मिनिटे धक्क्यावर धक्के; तीन जखमी

Next

नवी दिल्ली : २३६ प्रवाशांना घेऊन जाणाºया विमानाला हजारो फुटांवर १५ मिनिटे धक्क्यावर धक्के बसत होते. याच काळात एक प्रवासी आपल्या जागेवरून उडाला. विमानाचा आॅटो पायलट मोडही अचानक बंद झाला, पण वैमानिकाने कसब दाखवत अखेर हवामानाच्या तडाख्यातून सर्वांची सुटका केली. अमृतसर येथून दिल्लीला जाणाºया एअर इंडियाच्या बोर्इंग ७८७ ड्रीमलाइनर विमानात ही घटना घडली.
विमानाने अमृतसह येथून उड्डाण घेतल्यानंतर हे विमान ८ हजार फुटांवरून २१ हजार फुटांवर जात होते. त्याच वेळी खराब हवामानाच फटका विमानाला बसला. विमानाच्या एका खिडकीचे आतील पॅनेल निखळले व काही ओव्हरहेड आॅक्सिजन मास्कही बाहेर आले. तब्बल १५ मिनिटे हा थरार सुरू होता. प्रवासी जिवाच्या आकांताने ओरडत होते. काहींनी देवाच्या धावाही सुरू केल्या होत्या. आता आपले काही खरे नाही, असेही काहींच्या मनात आले. विमान हेलकावे खात होते. त्यामुळे सीट बेल्ट न लावलेला एक प्रवासी आसनावरून उंच उडाला व त्याचे डोके केबिनला आदळले. तो जखमी झाला. आणखी दोन प्रवासीही किरकोळ जखमी
झाले. सुदैव इतकेच या खिडकीच्या बाह्यभागाचे काहीही नुकसान
झाले नाही.

सव्वा तासाच्या या प्रवासानंतर अखेर हे विमान दिल्ली विमानतळावर सुखरूप उतरले. त्यानंतर, जखमी प्रवाशांवर उपचार करून त्यांना सोडण्यात आले आहे. या प्रकरणाची एअर इंडिया व हवाई वाहतूक खात्याने चौकशी सुरू केली आहे.

सिंगापूरच्या विमानालाही बसला होता तडाखा
एअर इंडियाच्या विमानाला जसा खराब हवामानाचा फटका बसला, तशाच परिस्थितीचा सामना २०१४ साली आॅक्टोबर महिन्यात सिंगापूर एअरलाइन्सच्या एअरबस ए-३८० विमानाला करावा लागला होता. हे विमान मुंबईला चालले होते. त्या वेळी विमानातील आठ प्रवासी व १४ विमान कर्मचारी यांच्यासह २२ जण जखमी झाले होते. हे विमान मुंबईत उतरताच या सर्व जखमींवर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले.

Web Title: 236 passengers on board take a 15-minute shock over thousands of feet; Three injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात