जि.प.साठी २३८३ मतदान केंद्र निि›त २१ लाख ५९ हजार मतदार: सर्वाधिक मतदार चाळीसगाव तालुक्यात

By admin | Published: January 23, 2017 08:13 PM2017-01-23T20:13:33+5:302017-01-23T20:13:33+5:30

जळगाव : जिल्हा परिषदेची अधिसूचना येत्या २७ रोजी प्रसिद्ध होणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी २१ लाख ५९ हजार ८१८ मतदार असून २३८३ मतदान केंद्र निि›त करण्यात आले आहेत. चाळीसगाव व जामनेर तालुक्यात सर्वाधिक ७ गट असून सर्वाधिक २ लाख ४६ हजार २४७ मतदार चाळीसगाव तालुक्यात आहेत.

2383 polling stations for District wise 21.55 lakh voters: Most voters in Chalisgaon taluka | जि.प.साठी २३८३ मतदान केंद्र निि›त २१ लाख ५९ हजार मतदार: सर्वाधिक मतदार चाळीसगाव तालुक्यात

जि.प.साठी २३८३ मतदान केंद्र निि›त २१ लाख ५९ हजार मतदार: सर्वाधिक मतदार चाळीसगाव तालुक्यात

Next
गाव : जिल्हा परिषदेची अधिसूचना येत्या २७ रोजी प्रसिद्ध होणार असल्याने जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. या निवडणुकीसाठी २१ लाख ५९ हजार ८१८ मतदार असून २३८३ मतदान केंद्र निि›त करण्यात आले आहेत. चाळीसगाव व जामनेर तालुक्यात सर्वाधिक ७ गट असून सर्वाधिक २ लाख ४६ हजार २४७ मतदार चाळीसगाव तालुक्यात आहेत.
जिल्हा परिषदेच्या ६७ गटांसाठी व पंचायत समित्यांच्या १३४ गणांसाठी पुढील महिन्यात १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीची अधिसूचना २७ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणार आहे. उमेदवारी दाखल करण्यासही याच दिवसापासून प्रारंभ होणार आहे. १ फेब्रुवारी हा उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. उमेदवारी दाखल करण्यासाठी केवळ ६ दिवस आहेत मात्र त्यातील एक दिवस हा रविवार असल्यामुळे त्या दिवशीही अर्ज स्विकारले जाणार नसल्याने आयोगाने स्पष्ट केले आहेत. त्यामुळे केवळ पाच दिवस हा उमेदवारी दाखल करण्यासाठी असतील.
प्रत्येक तहसीलला नियोजन
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना तालुक्यांच्या तहसील कार्यालयांमध्ये यावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये त्याबाबत नियोजन सुरू झाले आहे. तहसील कार्यालयामध्ये अर्ज दाखल करण्यापूर्वी ते तपासून घेण्याच्या सूचना आहेत. तहसील कार्यालयामध्ये उमेदवारी दाखल करण्याच्या वेळेत म्हणजे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात पाच ते सहा टेबल लावून त्यावर कर्मचार्‍यांची नियक्ती करण्यात आली आहे.
२१ लाखावर मतदार
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्‘ात २१ लाख ५९ हजार ८१८ मतदार असून २३८३ मतदान केंद्र निि›त करण्यात आले आहेत. तालुकानिहाय मतदार व व कंसात मतदान केंद्र पुढील प्रमाणे आहे. चोपडा १,७१, २५५ (१९९), यावल १, ४७, ४६९ (१६०), रावेर १,८२,७४३ (२०६), मुक्ताईनगर १,२१,११७ (१३४), बोदवड ५०,६३६ (५९), भुसावळ १,०५,१८० (११५), जळगाव १,६६,३९६ (१८१), धरणगाव १ ,० २, ७२९ (१२३), अमळनेर १, ५४ १३८ (१९१), पारोळा १, २३,५४४ (१३१), एरंडोल ९५,९२२ (२२४), जामनेर २,२२,५२५ (२३५), पाचोरा १,७१,९५२ (१८५), भडगाव - ९७,९६५ (१०६), चाळीसगाव २,४६,२४७ (२५६) या प्रमाणे आहे.
----

Web Title: 2383 polling stations for District wise 21.55 lakh voters: Most voters in Chalisgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.