भीषण अपघात: वऱ्हाडाची बस नदीमध्ये कोसळली; 24 जणांचा बुडून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 12:44 PM2020-02-26T12:44:12+5:302020-02-26T12:45:23+5:30
वऱ्हाडाच्या बसमधून 30 जण प्रवास करत होते. त्यापैकी 18 जण बुडाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.
राजस्थानमध्ये एका वऱ्हाडाच्या बसला भीषण अपघात झाला. ही बस थेट नदीत कोसळल्याने 24 जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत. या बसमध्ये 30 जण प्रवास करत होते.
हा अपघात बुंदीमधील कोटा लालसोट मेगा हाय़वेवर झाला आहे. ही बस मेज नदीमध्ये कोसळल्याने सुरुवातीला 18 जण बुडाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बचाव कार्यावेळी 24 मृत झाल्याचा आकडा समोर आला आहे.
Rajasthan: Several feared dead after a bus falls into a river near a village on Kota Lalsot Mega Highway in Bundi. More details awaited. pic.twitter.com/FlLtjes9H7
— ANI (@ANI) February 26, 2020
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मदत सुरू केली असून बसचा वेग जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि वऱ्हाड्यांसह बस पाण्यामध्ये कोसळली. बसमध्ये राहणारे सर्वजण कोटामध्ये राहणारे आहेत.
वऱ्हाडींना घेऊन जाणारी ही बस कोटाहून मायरा जात होती. या दुर्घटनेवर खासदार बेनिवाल यांनी ट्वीट करून दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना त्वरीत मदत करण्याची विनंती केली आहे.