आंतरजातीय विवाह करणा-यांच्या मदतीसाठी 24 तास हेल्पलाइन

By Admin | Published: April 13, 2016 07:19 PM2016-04-13T19:19:33+5:302016-04-13T19:20:42+5:30

मद्रास उच्च न्यायालयानं मद्रास सरकारला आंतरजातीय विवाह करणा-यांना आसरा देण्यासाठी 24 तास हेल्पलाइन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

24-hour helpline to help inter-caste marriages | आंतरजातीय विवाह करणा-यांच्या मदतीसाठी 24 तास हेल्पलाइन

आंतरजातीय विवाह करणा-यांच्या मदतीसाठी 24 तास हेल्पलाइन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
मद्रास, दि. १३- मद्रास उच्च न्यायालयानं मद्रास सरकारला आंतरजातीय विवाह करणा-यांना आसरा देण्यासाठी 24 तास हेल्पलाइन सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी एका स्पेशल सेलची स्थापना करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत. तामिळनाडूतल्या एका हत्या प्रकरणात सुनावणीदरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं हा आदेश दिला आहे.
न्यायालयानं यावेळी सरकारला आंतरजातीय विवाह करणा-यांच्या सुरक्षेसाठी विस्तारपूर्वक सामग्रीची व्यवस्थाही करण्यास सांगितलं आहे. सरकारनं आंतरजातीय विवाहाला विरोध करणा-या पालकांनाही सवाल विचारण्याची न्यायालयानं सूचना केली आहे. गेल्या तीन वर्षांत जवळपास आंतरजातीय विवाहाच्या वादातून 81 जणांची हत्या करण्यात आल्याची माहिती दलितांच्या न्यायासाठी संघर्ष करणा-या एका एनजीओनं दिली आहे.
आरटीआय कार्यकर्त्यांच्या मते, राजकीय फायद्यासाठी सरकार हत्या करणा-याविरोधात सोम्य कारवाई करते. यावेळी उच्च न्यायालयानं 2014ला दिलीपकुमारशी आंतरजातीय विवाह केल्याचा बळी ठरलेल्या विमल देवी हत्या प्रकरणाला जबाबदार असलेल्या 5 पोलिसांवर कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत.

Web Title: 24-hour helpline to help inter-caste marriages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.