२४ तास अखंड वीजपुरवठा
By admin | Published: July 14, 2016 03:14 AM2016-07-14T03:14:37+5:302016-07-14T03:14:37+5:30
देशात सर्वांना २0१७ अखेर २४ तास वीज अखंड पुरवण्याचे मिशन केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हाती घेतले आहे. ‘वन नेशन, वन ग्रीड’ घोषणेनुसार नॅशनल ग्रीडमार्फत २.२0 रुपये प्रतियुनिटच्या बेस दराने लिलावाद्वारे
नवी दिल्ली : देशात सर्वांना २0१७ अखेर २४ तास वीज अखंड पुरवण्याचे मिशन केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने हाती घेतले आहे. ‘वन नेशन, वन ग्रीड’ घोषणेनुसार नॅशनल ग्रीडमार्फत २.२0 रुपये प्रतियुनिटच्या बेस दराने लिलावाद्वारे सर्व राज्यांना हवा तसा अल्पकालिन वीजपुरवठा सध्या केला जात आहे. अनेक वर्षांनंतर देशात सध्या सरप्लस वीज उपलब्ध आहे, असे उद्गार केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी काढले.
ऊर्जा विभाग देशाच्या विकासाचे ग्रोथ इंजिन आहे. सर्वांना मुबलक वीज मिळावी, यासाठी आम्ही विशेष मेहनत घेत आहोत, असे नमूद करून
गोयल म्हणाले, ‘ग्रामीण विद्युतीकरणाचा पाठपुरावा करताना वीज नसलेल्या गावांना जोडणे, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेद्वारा ७0१८ नव्या गावांचे विद्युतीकरण, कोळसा खाणींचा पारदर्शक लिलाव, खाण विकासासाठी उपाययोजना, अशा विषयात गेल्या २ वर्षांत आम्ही प्रगतीची शिखरे गाठली आहेत.’
१ लाख कोटी रुपयांचे उदय बाँडस जारी करून, दोन वर्षांत डिस्कॉमच्या उदय योजनेची यशस्वी वाटचाल झाली. वीजनिर्मितीत देशात ४६ हजार ५४३ मेगावॅटची नव्याने भर, गतवर्षी म्हणजे २0१५/१६ वर्षात अवघी २.१ टक्के विजेची तूट. २00८/९मध्ये ही तूट ११.१ टक्के होती. पारदर्शक लिलाव पद्धतीने कोळसा खाणी असलेल्या राज्यांना ३.४४ लाख कोटींचे उत्पन्न याखेरीज ७४ कोळसा ब्लॉक्सना त्याचा लाभ. कोल इंडियाने गेल्या २ वर्षांत कोळसा उत्पादनात ७.४ कोटी टनांची भर घातली, असेही गोयल म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)