गंगा नदीत 24 जणांना जलसमाधी

By admin | Published: January 15, 2017 08:23 AM2017-01-15T08:23:29+5:302017-01-15T10:24:52+5:30

बिहारमध्ये बोट उलटून झालेल्या झालेल्या दुर्देवी दुर्घटनेती मृत्यूचा आकडा 24 वर पोहचला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे.

24 people in Ganga river water resources | गंगा नदीत 24 जणांना जलसमाधी

गंगा नदीत 24 जणांना जलसमाधी

Next
ऑनलाइन लोकमत 
पाटणा, दि. 15 - बिहारमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्देवी दुर्घटनेती मृत्यूचा आकडा 24 वर पोहचला आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. तीन एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी बेपत्ता प्रवाशांचा शोध घेत आहेत अशी माहिती नडीआरएफचे डायरेक्टरेट जनरल आर. के पाचेंडा यांनी दिली आहे. 
 
शनिवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास 50 जणांना घेऊन जाणारी बोट गंगा नदीत उलटल्याने हा अपघात झाला होता. मकरसंक्राती निमित्त पतंग उडवून परतत असताना ही दुर्घटना घडली. बिहारची राजधानी पाटण्यामध्ये हा अपघात झाला.
 
बोटीतील 25 जणांनी पोहून किनारा गाठला. आठ जणांची सुटका करण्यात यश आले. एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. वाचवण्यात आलेल्या आठ जणांवर पाटना मेडीकल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांच्या नातेवाईकांना बिहार सरकारने प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आली आहे.  
 
 

Web Title: 24 people in Ganga river water resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.