बांगलादेश : २४ जणांना नेत्याच्या हॉटेलात जिवंत जाळले; या ३ विद्यार्थ्यांमुळे आंदोलन पेटले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 12:10 PM2024-08-07T12:10:08+5:302024-08-07T12:10:40+5:30

सोमवारी रात्री उशिरा जमावाने जोशोर जिल्ह्यातील अवामी लीगचे जिल्हा सरचिटणीस शाहीन चक्कलदर यांच्या मालकीच्या जाबीर इंटरनॅशनल हॉटेलला आग लावली, त्यात २४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबलेले लोक होते.

24 people were burnt alive in the leader's hotel; These 3 students ignited the movement  | बांगलादेश : २४ जणांना नेत्याच्या हॉटेलात जिवंत जाळले; या ३ विद्यार्थ्यांमुळे आंदोलन पेटले

बांगलादेश : २४ जणांना नेत्याच्या हॉटेलात जिवंत जाळले; या ३ विद्यार्थ्यांमुळे आंदोलन पेटले

ढाका : बांगलादेशातील अवामी लीग पक्षाच्या नेत्याच्या मालकीच्या हॉटेलमध्ये एका इंडोनेशियन नागरिकासह किमान २४ जणांना जमावाने जिवंत जाळले. पक्षाच्या नेत्या शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देश सोडला असताना, ही घटना घडली आहे. स्थानिक पत्रकार आणि रुग्णालयाच्या सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.

सोमवारी रात्री उशिरा जमावाने जोशोर जिल्ह्यातील अवामी लीगचे जिल्हा सरचिटणीस शाहीन चक्कलदर यांच्या मालकीच्या जाबीर इंटरनॅशनल हॉटेलला आग लावली, त्यात २४ जणांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश हॉटेलमध्ये मुक्कामाला थांबलेले लोक होते.

जोशोर रुग्णालयातील डॉक्टरांनी २४ मृतदेह मोजले, तर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह असल्याची भीती वाटत आहे. संतप्त जमावाने हॉटेलच्या तळमजल्यावर आग लावली आणि ती लवकरच वरच्या मजल्यांवर पसरली. अशाच घटना संपूर्ण बांगलादेशात घडल्या असून, संतप्त जमावाने एकाच वेळी अनेक अवामी लीग नेते आणि कार्यकर्त्यांच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड केली.

नाहिद इस्लाम 
त्याने म्हटले होते की, लाठी चालली नाही तर आम्ही शस्त्र उचलण्यास तयार आहोत. आता हसीना यांना निर्णय घ्यायचा आहे की त्या पदावरून पायउतार होतील की पदावर राहण्यासाठी रक्तपाताची मदत घेतील. नाहिद हा ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. त्याला पोलिसांनी लोखंडी रॉडने मारहाण केली होती.

आसिफ महमूद
आसिफ महमूद हा ढाका विद्यापीठातील भाषा अभ्यासाचा विद्यार्थी आहे. आरक्षणाविरोधातीलआंदोलनाचा तो भाग झाला. २६ जुलै रोजी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आसिफला इंजेक्शन देण्यात आले त्यामुळे तो अनेक दिवस बेशुद्ध होता. आंदोलन मागे घेण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर दबाव टाकला होता.

अबू बकर मजूमदार 
तो ढाका विद्यापीठातील भूगोल विभागाचा विद्यार्थी.  ५ जून रोजी उच्च न्यायालयाने आरक्षणावर निर्णय दिल्यानंतर, बकर याने मित्रांसह विद्यार्थी आंदोलन सुरू केले. पोलिसांनी त्याला एका खोलीत बंद केले होते. आंदोलन मागे घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकण्यात येत होता, मात्र तो मागे हटला नाही.


 

Web Title: 24 people were burnt alive in the leader's hotel; These 3 students ignited the movement 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.