२४ हजार ब्रास गौण खनिज साठा सापडला १५ तालुक्यांतील स्थिती : बांधकाम मालकांना प्रशासन बजावणार नोटीस

By admin | Published: December 16, 2015 11:50 PM2015-12-16T23:50:24+5:302015-12-16T23:50:24+5:30

जळगाव : जिल्हा वाळू उपशाला बंदी घातल्यानंतरदेखील अनेक भागांमध्ये बांधकाम सुरू आहेत. तसेच अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांमार्फत वाळू, डबर, मुरूम, माती व खडीच्या साठ्यांची तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. बुधवारपर्यंत १५ तालुक्यांमध्ये २४ हजार ६५४ ब्रास गौण खजिनांचा साठा मिळून आला आहे.

24 thousand brass minor minerals found in 15 talukas: Notice to construct owners | २४ हजार ब्रास गौण खनिज साठा सापडला १५ तालुक्यांतील स्थिती : बांधकाम मालकांना प्रशासन बजावणार नोटीस

२४ हजार ब्रास गौण खनिज साठा सापडला १५ तालुक्यांतील स्थिती : बांधकाम मालकांना प्रशासन बजावणार नोटीस

Next
गाव : जिल्हा वाळू उपशाला बंदी घातल्यानंतरदेखील अनेक भागांमध्ये बांधकाम सुरू आहेत. तसेच अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक सुरू असल्याने जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांमार्फत वाळू, डबर, मुरूम, माती व खडीच्या साठ्यांची तलाठ्यांमार्फत पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. बुधवारपर्यंत १५ तालुक्यांमध्ये २४ हजार ६५४ ब्रास गौण खजिनांचा साठा मिळून आला आहे.
भडगाव व बोदवड तालुक्यात निरंक
अपर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी जिल्हाभरातील गौण खजिनांच्या साठ्यांच्या तपासणीसाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करून दिला होता. त्यानुसार १५ तालुक्यांमध्ये ही मोहीम राबविण्यात आली. मात्र बोदवड व भडगाव तालुक्यात गौणखनिजाचा एकही साठा मिळून आला नाही.
खेडी शिवारात सापडली २३ हजार ब्रास माती
सर्वाधिक वाळूचे साठे हे जळगाव शहरात आढळून आले. त्यातच खेडी भागातील तलाठ्यांनी केलेल्या पाहणीत गट नंबर १३२ ते १३५ या मध्ये तब्बल २३ हजार ३८७ ब्रास मातीचा साठा आढळून आला. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने बी.एन.अग्रवाल यांना ९ कोटी १२ लाख ९ हजार ३०० रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. जळगाव शहरात वाळू व गौण खनिजाची एकत्रित स्वरुपांच्या दंडात्मक नोटीसची रक्कम ही ९ कोटी ७० लाख ६२ हजार ६०० रुपयांची आहे.
दंड न भरल्यास फौजदारी कारवाईचा इशारा
जिल्हा प्रशासनातर्फे १५ तालुक्यांमधील गौणखनिज साठविणार्‍या मालकांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर दोन दिवसात त्यांचा खुलासा मागविण्यात येणार आहे. समाधानकारक खुलासा नसल्यास किंवा कुणाच्या मार्फत गौण खजिनाची खरेदी केली याबाबत माहिती न दिल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यानंतरही बांधकाम मालक व ठेकेदाराने दाद न दिल्यास प्रसंगी फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


गौण खजिन पंचनामाब्रासदंडात्मक रक्कम
वाळू ७७१४४१ ६१३५४००
डबर २७१ ०००
मुरुम ४१३० ३०६००
माती १२३००० ९१२०९३००
खडी ५१२ ६४९००

Web Title: 24 thousand brass minor minerals found in 15 talukas: Notice to construct owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.