आठ वर्षांत २४० नेते भाजपमध्ये दाखल; सत्तेचे गणित जुळवण्यात होतेय मोठी मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 10:46 AM2022-12-06T10:46:30+5:302022-12-06T10:46:58+5:30

भाजपमध्ये ज्या पक्षातील नेते दाखल झाले, त्यात बसपा, तृणमूल, सपा आणि अन्य पक्षांच्या आमदार, खासदारांचा समावेश आहे

240 leaders joined BJP in eight years; There is a for big help in forming government | आठ वर्षांत २४० नेते भाजपमध्ये दाखल; सत्तेचे गणित जुळवण्यात होतेय मोठी मदत

आठ वर्षांत २४० नेते भाजपमध्ये दाखल; सत्तेचे गणित जुळवण्यात होतेय मोठी मदत

googlenewsNext

हरिश गुप्ता

नवी दिल्ली - २०२२ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने दुसऱ्या पक्षातून आलेल्या सर्वाधिक १८ उमेदवारांना रिंगणात उतरविले आहे. हे प्रमाण त्यांच्या एकूण उमेदवारांच्या १० टक्के आहे. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत अन्य पक्षातून आलेल्या २ टक्के उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते. तर, २०१७ च्या निवडणुकीत अशा ९ टक्के उमेदवारांना तिकीट देण्यात आले होते.

२०१७ मध्ये यापैकी ३० टक्क्यांपेक्षा कमी उमेदवार जिंकून येऊ शकले असे नंतर दिसून आले. तरीही प्रतिस्पर्ध्याना कमकुवत करण्यासाठी भाजपाने २०२२ मध्ये अशा उमेदवारांवर विश्वास दाखविला. विशेष म्हणजे, गेल्या ८ वर्षांत अनेक राज्यांतून वेगवेगळ्या पक्षातील २४० नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

अमित शहा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे भाजपाचे वरिष्ठ रणनीतीकार म्हणाले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत यापैकी ९० टक्के जागा जिंकू शकत नव्हतो. जर, अन्य पक्षातून आलेले नेते आमच्या एकूण संख्येत भर घालत असतील तर काय चूक आहे.

कुठे काय घडले?
महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि इतर राज्यात भाजपने अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांकडे मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येते. तर, काँग्रेसने अनेक आमदार आणि खासदार या काळात गमावले. २०१४ ते मार्च २०२२ पर्यंत यावर्षीच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत या पक्षाचे १९७ आमदार, खासदार आणि अन्य नेते यांनी पक्ष सोडला. यात गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडमधील नेत्यांचा समावेश आहे.

मध्य प्रदेश, कर्नाटकात मिळविली सत्ता  
मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात २२ आमदारांनी बंडखोरी केल्याने भाजपने मध्य प्रदेशात पुन्हा सत्ता मिळविली. २०१९ मध्ये कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दलच्या (सेक्युलर) आघाडीतील १६ आमदार भाजपमध्ये सहभागी झाले आणि भाजपने पुन्हा सत्ता मिळविली.

अशोका युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या त्रिवेदी सेंटर फॉर पॉलिटिकल डेटा सेंटरच्या माहितीनुसार गेल्या दशकातील विधानसभा निवडणुकीत भाजपने अन्य पक्षातून आलेले सर्वाधिक ८३० उमेदवार उभे केले. ज्या राज्यात भाजपची ताकद कमी आहे अशा राज्यात भाजप २०१४ पासून पक्षाचा विस्तार करण्यासाठी जोरदारपणे प्रयत्न करत आहे.

पराभूत होऊनही आले सत्तेत
भाजपमध्ये ज्या पक्षातील नेते दाखल झाले, त्यात बसपा, तृणमूल, सपा आणि अन्य पक्षांच्या आमदार, खासदारांचा समावेश आहे. अशा नेत्यांची एकूण संख्या २४० आहे. मध्य प्रदेश, मणिपूर, गोवा यासारख्या राज्यांत निवडणुकीत पराभूत होऊनही भाजपने आपली सरकारे स्थापन केली.

Web Title: 240 leaders joined BJP in eight years; There is a for big help in forming government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा