उत्तरप्रदेशात 11 वाजेपर्यंत 24.50 टक्के मतदान

By Admin | Published: February 11, 2017 09:47 AM2017-02-11T09:47:14+5:302017-02-11T13:37:13+5:30

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे.

24.50 percent polling till 11 pm in Uttar Pradesh | उत्तरप्रदेशात 11 वाजेपर्यंत 24.50 टक्के मतदान

उत्तरप्रदेशात 11 वाजेपर्यंत 24.50 टक्के मतदान

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. 11 - संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तरप्रदेशातील 73 जागांसाठी मतदान होत आहे. इथे मुस्लिम मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे प्रचारात सर्वच पक्षांनी मुस्लिम मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. सकाळी 11 वाजेपर्यंत 24.50 टक्के मतदान झाले. 
 
ही निवडणूक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळपास तीन वर्षांच्या कार्यकाळाची ही परीक्षा समजली जात आहे. राज्यात ११ फेब्रुवारी ते ८ मार्च या काळात सात टप्प्यात मतदान होणार आहे.  पहिल्या टप्प्यातील या मतदानात १ कोटी १७ लाख महिलांसह एकूण २ कोटी ६० लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ८३९ उमेदवारांच्या भवितव्याचा आज फैसला होणार असून मतदानासाठी २६,८२३ केंद्र असणार आहेत.
 
पश्चिमांचलच्या मुस्लिमबहुल भागात मतदान होत आहे. यात प्रामुख्याने शामली, मुजफ्फरनगर, बागपत, मेरठ, गाजियाबाद, गौतमबुद्धनगर, हापुड, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा, हाथरस, आग्रा, फिरोजाबाद, एटा आणि कासगंज जिल्ह्यांचा समावेश आहे. 
 
पहिल्या टप्प्यातील मतदानात जे प्रमुख उमेदवार आहेत त्यात नोएडामधून केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह, भाजपचे संसद सदस्य हुकुम सिंह यांची मुलगी मृगांका कैराना मतदारसंघातून तर, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीकांत शर्मा आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते प्रदीप माथुर हे मथुरा येथून निवडणूक लढवित आहेत. भाजपचे वादग्रस्त आमदार संगीत सोम आणि सुरेश राणा अनुक्रमे सरधना आणि थाना भवन येथून नशिब आजमावत आहेत. बागपत हा राष्ट्रीय लोक दलाचा बालेकिल्ला मानला जातो.

Web Title: 24.50 percent polling till 11 pm in Uttar Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.