२५ बालकांना शौर्य पुरस्कार प्रदान

By admin | Published: January 25, 2016 01:52 AM2016-01-25T01:52:53+5:302016-01-25T01:52:53+5:30

तलावात बुडणाऱ्या चार मित्रांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आपल्या प्राणाची बाजी लावणारा नागपूरचा गौरव कवडूजी सहस्रबुद्धे, कोथळी

25 bravery award for children | २५ बालकांना शौर्य पुरस्कार प्रदान

२५ बालकांना शौर्य पुरस्कार प्रदान

Next

नवी दिल्ली : तलावात बुडणाऱ्या चार मित्रांचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात आपल्या प्राणाची बाजी लावणारा नागपूरचा गौरव कवडूजी सहस्रबुद्धे, कोथळी (जळगाव) येथील नीलेश भिल्ल, सिंदी रेल्वे (वर्धा) येथील वैभव रामेश्वर घंगारे आणि वाळकेश्वर (मुंबई) येथील मोहित दळवी या महाराष्ट्रातील चार बालकांसह एकूण २५ बालकांना रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बालशौर्य पुरस्काराने गौरविण्यात आले. संपूर्ण समाजाने या बालकांकडून प्रेरणा घ्यावी, असे गौरवोद्गार मोदींनी यावेळी काढले.
मनुष्य, समाज आणि निसर्गाप्रति आपुलकीची भावना आपल्याला प्रेरणा देते. ही प्रेरणा शूरतेत परिवर्तित होते. पण एखाद प्रसंगी दाखवलेले हे शौर्य आपला स्वभाव बनला पाहिजे. असे होत नसेल तर शौर्य गाजवलेला तो क्षण केवळ घटना बनून राहते. शौर्य पुरस्कारप्राप्त बालकांचे मी अभिनंदन करतो. पण आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण बनू देऊ नका. बाल शौर्य पुरस्कार तुम्हाला प्रसिद्धी, प्रशंसा, ओळख मिळवून देईल.

Web Title: 25 bravery award for children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.