२५ जण जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार एक गंभीर : जखमींमध्ये सर्वाधिक पाचोरा, भडगाव तालुक्यातील, मयत महिलेची ओळख पटेना

By admin | Published: July 18, 2016 11:32 PM2016-07-18T23:32:07+5:302016-07-18T23:32:07+5:30

जळगाव : वावडदा ते वडली दरम्यान झालेल्या दोन बसच्या अपघातात २५ जण जखमी झाले असून यातील एका वद्धेची प्रकृती गंभीर आहे. अपघातात ठार झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. या अपघातात दोन्ही बसच्या वाहक चालकांसह चाळीसगाव आगाराच्या सहायक आगार प्रमुखांचाही समावेश आहे.

25 injured in critical condition in district hospital: Most of the injured have been identified as Pachora, Bhadgaon taluka, | २५ जण जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार एक गंभीर : जखमींमध्ये सर्वाधिक पाचोरा, भडगाव तालुक्यातील, मयत महिलेची ओळख पटेना

२५ जण जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार एक गंभीर : जखमींमध्ये सर्वाधिक पाचोरा, भडगाव तालुक्यातील, मयत महिलेची ओळख पटेना

Next
गाव : वावडदा ते वडली दरम्यान झालेल्या दोन बसच्या अपघातात २५ जण जखमी झाले असून यातील एका वद्धेची प्रकृती गंभीर आहे. अपघातात ठार झालेल्या महिलेची ओळख पटलेली नाही. या अपघातात दोन्ही बसच्या वाहक चालकांसह चाळीसगाव आगाराच्या सहायक आगार प्रमुखांचाही समावेश आहे.
अपघातातील जखमी....
पाचोरा आगाराचे वाहक भीमराव धोंडू बाविस्कर (४४, रा. डोणगाव), चालक सीताराम पाटील (४७), दुसर्‍या बसचे चालक सुरज कुमावत (३६, रा. चाळीसगाव) यांच्यासह चाळीसगाव आगाराचे सहायक आगार व्यवस्थापक प्रकाश नामदेव चौधरी (५५, रा. चाळीसगाव) हे जखमी झाले. या व्यतिरिक्त सुजाता सुनील भागवत (२१, रा. पिंपळगाव हरे.), अनुसयाबाई नामदेव (७०), सोनाली पाटील (२८), लक्ष्मीबाई भास्कर पाटील (७०, रा. खेडी), अय्यूब दुलेखा पठाण (६४, रा. खडकदेवळा, ता. पाचोरा), श्रीराम यशवंत वाणी (७३, रा. नशिराबाद), सुनील पोपट पाटील (३२, रा. लोहटार, ता. पाचोरा), अनिल भगवान मांडोळे (२६, रा. लोहटार, ता. पाचोरा), दिलीप महारु वळवी (२५), बाबुलाल मन्ना तेली (७०, रा. गोंदेगाव, ता. पाचोरा), कोकिळाबाई हिंमत पाटील (६०, रा. डोमगाव), अमोल विश्वनाथ शिंदे (२७, रा. लातूर), रुकसानाबी शेख कादर (५०, रा. भडगाव), शेख कादर शेख समद (५५, रा. भडगाव), जवखेडा येथील बँकेचे निवृत्त अधिकारी दिलीप नंदसिंग पाटील (६०, रा. जवखेडा), छायाबाई दिलीपसिंग पाटील (५२, रा. जवखेडा), रेवनाथ किशोर शिरोळे (४०, रा. मेहरुण परिसर, जळगाव), मझहर खान नासेर खान (२५, रा. भुसावळ), इम्रानखान सलीमखान (३५, रा. भुसावळ), अक्षय राजेंद्र चव्हाण (२०, रा. महिंदळे, ता. भडगाव), कलाबाई दशरथ पाटील (६०, रा. डोमगाव, ता. जळगाव) हे प्रवासी जखमी झाले. यामधील कलाबाई पाटील यांची प्रकृती गंभीर असून त्यांना खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले.

मयत महिलेची ओळख पटेना....
अपघातात अंदाजे ३५ वर्षे वयाची एक महिला ठार झाली असून तिची ओळख पटली नाही. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करीत असताना या महिलेचा मृतदेह समोर ठेवण्यात आला होता, जेणेकरुन येणारे नातेवाईक अथवा मदत करणारे नागरिक तिला ओळखू शकतील. मात्र शेवटपर्यंत तिची ओळख पटली नाही.

Web Title: 25 injured in critical condition in district hospital: Most of the injured have been identified as Pachora, Bhadgaon taluka,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.