नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 जवान शहीद

By admin | Published: April 24, 2017 04:58 PM2017-04-24T16:58:59+5:302017-04-24T21:20:59+5:30

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले आहेत.

25 jawans martyred in Naxal attack | नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 जवान शहीद

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 25 जवान शहीद

Next
ऑनलाइन लोकमत
सुकमा, दि. 24 - छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले आहेत. 
सुकमा जिल्ह्यात काला पठारजवळ चिंतागुफा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) 74 बटालियनचे जवान आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाले असून सात जण जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या जवानांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सीआरपीएफच्या कॅम्पजवळ जादा जवानांचा फौजफाटा वाढविण्यात आला आहे. तसेच, जवानांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. येथील रोड ओपनिंगच्या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सीआरएफचे 90 जवान जात असताना 300 अधिक नक्षलवाद्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. याचबरोबर नक्षलवाद्यांनी शहीद जवानांकडील शस्त्रसाठा पळविला आहे.
नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह यांनी तात्काळ बैठक बोलावली आहे. तर, शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांबदद्ल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दु:ख व्यक्त केले असून त्यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंजराज अहिर यांना रायपूरला पाठविले आहे. बस्तरचे पोलीस महानिरीक्षक विकेकानंद सिन्हा आणि पोलीस उपमहानिरीक्षक सुंदरराज सुकमाकडे रवाना झाले आहेत.
दरम्यान, गेल्यावर्षी याच सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे 12 जवान शहीद झाले होते.
 
 
 


Web Title: 25 jawans martyred in Naxal attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.