प्रदूषणाने २५ लाख लोकांचा मृत्यू, २०१५चे भारतातील चित्र, अहवालातील धक्कादायक माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 03:49 AM2017-10-21T03:49:13+5:302017-10-21T03:51:54+5:30
हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.
नवी दिल्ली : हवा, पाणी आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणामुळे २०१५ मध्ये भारतात सर्वाधिक २५ लाख लोकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती लान्सेट जर्नलने शुक्रवारी प्रकाशित केलेल्या अहवालात दिली आहे.
यातील बहुतांश मृत्यू असंसर्गजन्य आजारातून झाले. प्रदूषणामुळे हृदयरोग, पक्षाघात, फुफ्फुसाचा कॅन्सर, श्वसनाच्या दुर्धर आजारांमुळे बहुतांश लोक मृत्युमुखी पडले. हवेच्या प्रदूषणाचा सर्वात मोठा वाटा राहिला.
२०१५ मध्ये जगभरात ६५ लाख लोक वायू प्रदूषणाला बळी पडले. पाण्यातील प्रदूषणामुळे १८ लाख लोकांना मृत्यूच्या दाढेत नेले. त्यापाठोपाठ कामाच्या स्थळी झालेले प्रदूषण धोकायदायक ठरले असून आठ लाख लोक दगावले. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ९२ टक्के मृत्यू हवेतील प्रदूषणामुळे झाले असल्याकडे आयआयटी दिल्ली आणि अमेरिकेच्या इकान स्कूल आॅफ मेडिसिनच्या संशोधकांनी लक्ष वेधले. (वृत्तसंस्था)
भारत, पाकिस्तान, चीन, बांगलादेश, मादागास्कर आणि केनयात उद्योग झपाट्याने वाढत असून चारपैकी एक मृत्यू प्रदूषणामुळे होतो.
- भारतात मृत्यूसंख्या- २५ लाख.
- चीनची मृत्यूसंख्या - १८ लाख.
- जागतिक स्तरावर प्रदूषणामुळे होणारे नुकसान दरवर्षी- ४.६ खर्व अमेरिकन डॉलर.
- दरवर्षी जगभरात प्रदूषणामुळे मृत्यू- ९० लाख.
- एकूण मृत्यूच्या तुुलनेत संख्या- १६ टक्के.
- अकाली मृत्यूसाठी सर्वात धोकायदायक ठरणाºया घटकांमध्ये प्रदूषणाचा वाटा सर्वाधिक.
- घरात आणि घराबाहेर होणारे प्रदूषण, जलप्रदूषण आणि जमिनीतून होणारे प्रदूषण तसेच रासायनिक प्रदूषण कारणीभूत.
- गरीब आणि मध्यमवर्गीयांना सर्वाधिक फटका.
- कोळसा खाणीत काम करणाºया कामगारांना न्यूमोकोनिसीसचा धोका.
- रंगकाम करणाºयांना ब्लॅडर कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर उद्भवतो.
- अॅसबेस्टॉसशी संबंधित काम करणाºयांनाही विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका.