२५ मिनिटात तीन सभा मनपा: तहकुब सभा घेतल्या पण आटोपत्या
By admin | Published: December 23, 2015 11:57 PM2015-12-23T23:57:10+5:302015-12-23T23:57:10+5:30
जळगाव : सफाई मक्त्याच्या वादानंतर दोन वेळा तहकूब झालेली महापालिका स्थायी समितीची सभा बुधवारी झाली मात्र तीन सभांचे कामकाज अवघ्या २५ मिनिटात आटोपले गेले.
Next
ज गाव : सफाई मक्त्याच्या वादानंतर दोन वेळा तहकूब झालेली महापालिका स्थायी समितीची सभा बुधवारी झाली मात्र तीन सभांचे कामकाज अवघ्या २५ मिनिटात आटोपले गेले. महापालिका स्थायी समितीची २० नोव्हेंबर रोजीची सभा सफाई मक्त्याच्या विषयावरून वादग्रस्त ठरली होती. प्रशासनाकडून शहराच्या सफाई सारख्या विषयावर गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याने स्थायी सदस्यांनी अधिकार्यांना धारेवर धरले होते. यानंतर जोपर्यंत सफाई मक्त्याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत सभेत न बसण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला होता. त्यानंतर ११ डिसेंबर रोजी स्थायी समितीची सभा बोलविण्यात आली होती. या सभेतही प्रभाग निहाय सफाई कामाचा ठेका देण्याचा विषय आला नाही. त्यामुळे स्थायी सदस्य नितीन ला व अन्य सदस्य संतप्त झाले. नाराजी व्यक्त करत सदस्यांनी या सभेतूनही बहिर्गमन केले होते. त्यानंतर सफाई मक्त्याचा विषय प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तो मार्गी लावला. त्यानंतर बुधवारी २३ रोजी दोन वेळा तहकूब झालेली व नियमित सभा सभापती नितीन बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात आली होती. विषयांना फारसा विरोध नाहीचसभेत २० नोव्हेंबर व ११ डिसेंबर रोजी तहकूब झालेल्या विषयांचे वाचन नगरसचिव निरंजन सैंदाणे यांनी केले. त्याला तातडीने मंजुरी देण्यात आली. प्रारंभी सात प्रशासकीय प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. त्यानंतर नियमित पाच विषय मंजूर करण्यात आले. यानंतर २३ च्या नियमित सभेला सुरुवात झाली. तीत सहा विषय चर्चेला होते. त्यांनाही मंजुरी देण्यात आली. जलशद्धीकरणासाठी लागणार्या पिवळ्या तुरटीच्या विषयावर तिच्या दर्जाविषयी पृथ्वीराज चव्हाण यांनी शंका उपस्थित करून तो नियमित तपासला जावा अशा सूचना केल्या. यावर डी.एस. खडके यांनी तशी तपासणी होत असल्याचे स्पष्ट केले.----- भोसलेंचा विषय तहकूबमनपातील तत्कालीन प्रभाग अधिकारी दिनकर भोसले यांच्यावरील गुरांचे चामडे प्रकरणातील आक्षेपांवरून त्यांच्या दोन वेतनवाढी कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय झाला आहे. त्यावर त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या तरतुदीचा आधार घेत स्थायी समितीपुढे अपिल केले आहे. मात्र सविस्तर चौकशी अहवाल सादर होईपर्यंत हा विषय घेऊ नये असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचविल्यानंतर हा विषय तहकूब ठेवला जावा अशा सूचना सभापती बरडे यांनी दिल्या. ----