मजूर फेडरेशनसाठी १४ जागा बिनविरोध २५ जणांची माघार : बळीरामदादा, गोपाळ देवकर, वाल्मीक पाटील यांचा समावेश
By admin | Published: January 27, 2016 11:15 PM2016-01-27T23:15:35+5:302016-01-27T23:15:35+5:30
जळगाव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या २० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बुधवारी तब्बल २५ उमेदवारांनी माघार घेतल्याने १४ संचालकांची बिनविरोध निवड झाली. त्यात जि.प.सदस्य गोपाळराव देवकर, कृउबाचे माजी सभापती बळीरामदादा सोनवणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील यांचा समावेश आहे.
Next
ज गाव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या २० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बुधवारी तब्बल २५ उमेदवारांनी माघार घेतल्याने १४ संचालकांची बिनविरोध निवड झाली. त्यात जि.प.सदस्य गोपाळराव देवकर, कृउबाचे माजी सभापती बळीरामदादा सोनवणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक वाल्मीक पाटील यांचा समावेश आहे.जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माघारीसाठी २८ जानेवारी रोजी दुपारी ३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मात्र बुधवारी निवडणूक निर्णय अधिकारी पी.बी.पाडवी यांच्याकडे तब्बल २५ उमेदवारांनी माघार घेतल्याचा अर्ज सादर केला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत आणखी काही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे.चौकटया जागा झाल्या बिनविरोधजळगाव शहर : गोपाळराव बाबूराव देवकर, जळगाव तालुका : बळीराम तोताराम सोनवणे, भुसावळ तालुका : राजेंद्र अमृत कोलते, मुक्ताईनगर : वाल्मिक विक्रम पाटील, यावल : एकनाथ कौतिक पाटील, रावेर: अशोक पांडूरंग महाजन, भडगाव : मधुकर विश्राम पाटील, एरंडोल : ईश्वर भिमसिंग पाटील, अमळनेर : विजय प्रभाकर पाटील, चोपडा : चंद्रकांत लोटू पाटील, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती : घन:श्याम डिगंबर खैरनार. विमुक्त जाती /विमुक्त जमाती: भगवान अमरसिंग पाटील, महिला गट: भानुमती रमेश पाटील, जयश्री धिरेंद्र पाटील.या उमेदवारांनी घेतली माघार सर्वसाधारण गट : चुनीलाल दौलत पाटील, पुरुषोत्तम चौधरी, बाबूराव दिनकर पाटील, क मलाकर शालीग्राम पाटील, परदेशी सरदारसिंग श्रावण, देसले राजेंद्र भास्करराव, पाटील किशोर विश्वासराव, खैरनार घन:श्याम दिगंबर, पाटील आबा अभिमान, पाटील योेगेश चुडामण, कदम रमेश काशीनाथ, पाटील दिनकर विजयसिंग, पाटील किशोर धुडकू, सोनवणे अनिल पंडितराव.अनुसूचित जाती/जमाती : तायडे लीलाधर सदाशिव.इतर मागास प्रवर्ग : कोलते राजेंद्र अमृत, पाटील किशोर धुडकू, पाटील विजय प्रभाकर, महाजन अशोक पांडुरंग, पाटील वाल्मीक विक्रम. विमुक्त जाती/ भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग : धनगर लताबाईर् दिलीपराव.महिला राखीव : धनगर लताबाई दिलीपराव, पाटील हर्षदा पंकज या उमेदवारांनी बुधवारी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.