२५ वाळू गटांची किंमत २५ टक्क्याने कमी विभागीय आयुक्तांची मंजुरी : दोन वेळा लिलाव करूनही मिळाली नव्हती बोली
By admin | Published: February 11, 2016 10:59 PM2016-02-11T22:59:45+5:302016-02-11T22:59:45+5:30
जळगाव : दोन वेळा लिलाव करूनही बोली न मिळालेल्या जिल्ातील २५ वाळू गटांची किंमत २५ टक्क्याने कमी करण्यास विभागीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही किंमत २१ कोटी २९ लाख ७३ हजार ५७१ वरून १५ कोटी ९७ लाख ३० हजार १७८वर आली आहे.
Next
ज गाव : दोन वेळा लिलाव करूनही बोली न मिळालेल्या जिल्ातील २५ वाळू गटांची किंमत २५ टक्क्याने कमी करण्यास विभागीय मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही किंमत २१ कोटी २९ लाख ७३ हजार ५७१ वरून १५ कोटी ९७ लाख ३० हजार १७८वर आली आहे. जिल्ातील सात तालुक्यांमधील २५ वाळू गटांचा दोन वेळा लिलाव करूनही त्यास बोली मिळत नव्हती. त्यामुळे या वाळू गटांची किंमत कमी करण्याची परवानगी मिळण्याची मागणी जिल्हाधिकार्यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांना या गटांची किंमत २५ टक्क्याने कमी करण्यास मंजुरी दिली असून तसे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे. यामध्ये या गटांमधील एकूण ९८९५७ ब्रास वाळूची असलेली किंमत २१ कोटी २९ लाख ७३ हजार ५७१ वरून पाच कोटी ३२ लाख ४३ हजार ३९३ रुपयांनी कमी करून १५ कोटी ९७ लाख ३० हजार १७८ करण्यात आली आहे. या २५ वाळू गटांमधील प्रत्येक गटाची किंमत वेगवेगळी असून त्याचीही किंमत पत्रात नमूद करण्यात आली आहे. या मान्यता प्रदान केलेल्या वाळू गटांची लिलाव प्रक्रिया विहित केलेल्या कालावधित तसेच ई टेंडरिंग, ई ऑक्शन पद्धतीनेच पूर्ण करण्याचेही सूचीत केले आहे. तालुकानिहाय गटांची संख्याअमळनेर- ४, चोपडा-२, मुक्ताईनगर- २, एरंडोल-१, धरणगाव-५, पाचोरा-३, भडगाव-८. यामध्ये सर्वाधिक गट भडगाव तालुक्यातील असून तेथे या गटांना लिलाव न मिळाल्याने त्यांची किंमत कमी करण्यात आली आहे.