जोखीम घेऊन काढलेले २५ सेल्फी
By admin | Published: January 12, 2016 03:10 PM2016-01-12T15:10:39+5:302016-01-12T15:10:39+5:30
भरती ओहोटीचा विचार न करता एकमेकांना ढकलून मौजमस्ती सुरू होती. विशेष म्हणजे सेल्फीच्या नादातूनच नुकताच दोघांचा जीव गेल्याची थोडीही फिकीर आज परिसरात जाणवली नाही.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ - वांद्र्याच्या बँडस्टँड येथे सेल्फीचा नाद दोघांच्या जीवावर बेतला. सेल्फीच्या मोहापायी तरन्नुम अन्सारी (वय १७) हिने जीव गमावला. अंजुम व मुश्तरी या दोन मुलींना वाचवल्यानंतर रमेश वाळुंज (वय ३५) हा तरन्नुमला वाचवायला गेला, परंतु तरन्नुमने घाबरून त्याला घट्ट धरून ठेवल्याने बुडाला. असे असले तरी सेल्फीची हौस काही कुणाची कमी होताना दिसत नाहीये.
सेल्फीच्या नादात दोन जीव गेल्यानंतरही सेल्फीची ‘क्रेझ’ बँडस्टँड येथे दिसून आली. दुस-याच दिवसापासून तरुणाई मोठ्या संख्येने बँडस्टँडच्या समुद्रकिनाऱ्यावर तळ ठोकून होती. पाण्यात उभे राहून सेल्फी काढले जात होते. भरती ओहोटीचा विचार न करता एकमेकांना ढकलून मौजमस्ती सुरू होती. विशेष म्हणजे सेल्फीच्या नादातूनच नुकताच दोघांचा जीव गेल्याची थोडीही फिकीर आज परिसरात जाणवली नाही.
या पार्श्वभूमीवर डेंजरस सेल्फी काढण्याची हौस जगातच किती आहे हे दाखवणा-या २५ सेल्फींचा हा व्हिडीयो.