योगी सरकारच्या निर्णयामुळे 25 हजार होमगार्डवर बेरोजगारीची कुऱ्हाड!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 07:58 AM2019-10-15T07:58:56+5:302019-10-15T08:00:01+5:30
उत्तर प्रदेशातील पोलिसांसोबत येथील होमगार्ड्सना वेतन देण्यात येत होते.
लखनऊ : उत्तर प्रदेशात 25 हजार होमगार्ड एका झटक्यात बेरोजगार झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने सोमवारी होमगार्ड्सना सेवेतून कमी केले आहे.
रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातीलपोलिसांसोबत येथील होमगार्ड्सना वेतन देण्यात येत होते. परिणामी, योगी सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत होता. त्यामुळे सरकारने आर्थिक कारण समोर करत जवळपास 25 हजार होमगार्ड्सना घरचा रस्ता दाखविला आहे.
कायदा व्यवस्थेसाठी ड्युडी करणाऱ्या होमगार्ड्सच्या संख्येत सुद्धा 32 टक्के कपात करण्यात आली आहे. अतिरिक्त महासंचालकांच्या आदेशानंतर 25 हजार होमगार्ड्सच्या सेवा बंद झाल्या आहेत. अतिरिक्त महासंचालक पोलीस मुख्यालय,बीपी जोगदंड यांनी हा आदेश जारी केला आहे.
गेल्या 28 ऑगस्टला मुख्य सचिवांची बैठक झाली होती. यावेळी होमगार्ड्सची सेवा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आतापर्यंत 40 हजार होमगार्ड्सची सेवा कमी करण्यात आली आहे. होमगार्डला 25 दिवसांशिवाय आता फक्त 15 दिवसांची ड्युटी मिळणार आहे.