तरुणाला मारहाण करुन लुटले २५ हजार

By admin | Published: February 28, 2016 10:31 PM2016-02-28T22:31:38+5:302016-02-28T22:31:38+5:30

जळगाव: कोणाच्या परवानगीने दुकान लावले असा जाब विचारत राहुल सुरेश हटकर (रा.हरिविठ्ठल नगर) याने गणेश दुलाराम महाजन (वय ३५ रा.संभाजी नगर) याला मारहाण करुन त्याच्या खिशातील २५ हजार ४२० रुपये लुटून नेल्याचा प्रकार शनिवारी दुपारी १२ वाजता राजीव गांधी नगरात घडली. रविवारी हटकर याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

25 thousand looted by the youth | तरुणाला मारहाण करुन लुटले २५ हजार

तरुणाला मारहाण करुन लुटले २५ हजार

Next
गाव: कोणाच्या परवानगीने दुकान लावले असा जाब विचारत राहुल सुरेश हटकर (रा.हरिविठ्ठल नगर) याने गणेश दुलाराम महाजन (वय ३५ रा.संभाजी नगर) याला मारहाण करुन त्याच्या खिशातील २५ हजार ४२० रुपये लुटून नेल्याचा प्रकार शनिवारी दुपारी १२ वाजता राजीव गांधी नगरात घडली. रविवारी हटकर याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळ परिसरातील संभाजी नगरात राहणार्‍या गणेश या तरुणाचे राजीव गांधी नगरात दुकान आहे. शनिवारी नेहमी प्रमाणे तो दुकानात गेला असता हटकर याने त्याला तु कोणाच्या परवानगीने दुकान लावले असे म्हणत त्याच्याशी वाद घातला. यावेळी त्याने दुकानातील खुर्च्या व अन्य सामान फेकून दिला. गणेश याला मारहाण करत त्याच्या खिशातील २५ हजार रुपये काढून निघून गेला. गणेश याने भीतीपोटी शनिवारी तक्रार दिली नाही, त्यामुळे रविवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: 25 thousand looted by the youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.