रेल्वे प्रवासात मिळणार २५ प्रकारचा चहा
By admin | Published: February 9, 2016 02:00 PM2016-02-09T14:00:28+5:302016-02-09T14:00:28+5:30
चहाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करताना चहाप्रेमींना आता रेल्वेमध्ये विविध २५ प्रकारच्या चहाचा आस्वाद घेता येणार आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - चहाप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेने लांब पल्ल्याचा प्रवास करताना चहाप्रेमींना आता रेल्वेमध्ये विविध २५ प्रकारच्या चहाचा आस्वाद घेता येणार आहे. भारतीय रेल्वे खाद्यपेय आणि पर्यटन विभागाने (आयआरसीटीसी) रेल्वेमध्ये २५ विविध प्रकारचा चहा सुरु करण्याचा प्रस्ताव दिला आहे.
या चहामध्ये आतापर्यंत फारशा ऐकण्यात न आलेल्या आम पापड चाय, हरी मिर्च चाय, कुल्हड चाय, अद्रक तुलसी चाय, हनी गिंगर लेमन, अशा प्रकारच्या चहांचा समावेश आहे. आयआरसीटीसीने मोबाइल अॅप सुरु केले आहे त्यावरुन तुम्ही ऑर्डर नोंदवू शकता.
ट्रेन प्रवासात बहुतांश प्रवासी वाफाळलेल्या चहाचा आस्वाद घेतात. आयआरसीटीसी लवकरच आघाडीची चहा-कॉफीची चेन 'चायो' बरोबर करार करणार आहे. रेल्वे प्रवाशांसाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आयआरसीटीसी तीनशे रुपयांपेक्षा जास्त असलेल्या ई-कॅटरिंगच्या ऑर्डरवर १० टक्के सवलत देणार आहे.