२५ वाहनांचा अपघात

By admin | Published: February 11, 2016 03:36 AM2016-02-11T03:36:30+5:302016-02-11T03:36:30+5:30

हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी २५ वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चार सदस्यांसह

25 vehicles accidents | २५ वाहनांचा अपघात

२५ वाहनांचा अपघात

Next

चंदीगड : हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यात दिल्ली-अंबाला राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी २५ वाहने एकमेकांवर आदळल्याने झालेल्या विचित्र अपघातात एकाच कुटुंबातील चार सदस्यांसह ५ जण ठार, तर १५ जखमी झाले.
जिल्ह्यातील निलोखेडी गावाजवळ हा अपघात झाला, असे कर्नालचे पोलीस अधीक्षक पंकज नैन यांनी सांगितले. सकाळी दाट धुक्यांमुळे समोरचे न दिसल्याने एक कार उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. त्यानंतर त्या कारच्या मागून येणारी इतर वाहने एकापाठोपाठ एक समोरच्या वाहनांवर आदळत गेली.
ट्रकच्या धडकेने तीन मुली ठार
राय बरेली : ट्रकच्या धडकेने तीन किशोरवयीन मुली ठार झाल्या. येथील लालगंज कोतवाली भागात बुधवारी घडला. पोलीस भरतीसाठी पूजा, ज्योती (दोघीही १८) आणि पूनम (१६) धावण्याचा सराव करीत असताना ही दुर्घटना घडली. (वृत्तसंस्था)

एकाच कुटुंबातील ४
या अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले असून त्यापैकी चौघे उत्तर प्रदेशातील एकाच कुटुंबातील आहेत. लग्नासाठी ते पंजाबला जात होते. गंभीर जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, महामार्ग स्वच्छ केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.

दोन ट्रक्समध्ये रिक्षा येऊन सात जण ठार
बहरामपूर (पश्चिम बंगाल) : दोन ट्रक्समध्ये व्हॅन रिक्षा चेंदली जाऊन सात जण ठार तर चार जण जखमी झाले.
ही दुर्घटना मुर्शिदाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ३४ वरील आयहोरन येथे बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली. हे दोन्ही ट्रक्स अतिशय वेगात असताना ही ११ प्रवाशांना घेऊन निघालेली व्हॅन रिक्षा त्यांच्यामध्ये सापडली.
सर्व जखमींना जांगीरपूर उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर दोन्ही ट्रक्सचे चालक फरार झाले.

कालव्यात पडलेल्या सहाही जवानांना पाणबुड्यांनी वाचविले
गाझियाबाद : कालव्यात पडलेल्या ट्रकमधील सहाही जवानांना स्थानिक पाणबुड्यांनी त्यांना वाचविले. हे जवान मेरठ लष्करी छावणीतील होते व दिल्लीला निघाले होते. त्यांना घेऊन जाणारा ट्रक येथील मुरादनगर भागातील गंगा कालव्यात पडला.
चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात सकाळी साडेसातच्या सुमारास घडला.

Web Title: 25 vehicles accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.