Accident: बैलाच्या धडकेत तरूणाचा मृत्यू; कुटुंबाने गमावला एकुलता एक मुलगा, 22 तारखेला होणार होतं लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 03:00 PM2023-01-20T15:00:46+5:302023-01-20T15:01:51+5:30
बैलाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
रेवाडी : हरयाणाच्या रेवाडी जिल्ह्यातील भाडावास गावाजवळ बैलाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. खरं तर तो एकुलता एक मुलगा असून 22 फेब्रुवारी रोजी त्याचे लग्न होणार होते. अपघाताची माहिती त्याच्या गावात पोहोचताच सर्वत्र शोककळा पसरली. 25 वर्षीय तनुज तिवारी सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत होता. काल रात्री तो दुचाकीवरून गावी परतत असताना हा अपघात झाला. तो त्याच्या गावाजवळ आला असता त्याची दुचाकी बैलाला धडकली. अपघातानंतर तो दुचाकीवरून खाली पडला. तेथून जाणाऱ्या लोकांनी तातडीने गंभीर जखमी तनुजला ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मृत तनुज तिवारी हा सार्वजनिक आरोग्य विभागात डीसी पेटवर कार्यरत होता. काल रात्री तो दुचाकीवरून गावी परतत होता. तो त्याच्या गावाजवळ आला असता त्याची दुचाकी बैलाला धडकली. धडक होताच तो दुचाकीवरून खाली पडला. तेथून जाणाऱ्या लोकांनी गंभीर जखमी तनुजला ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. लक्षणीय बाब म्हणजे या अपघातात बैलाचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
22 तारखेला होणार होतं लग्न
तनुज तिवारीचा विवाह 22 फेब्रुवारी रोजी होणार होता आणि घरात लग्नाची तयारी सुरू होती. त्याच्या दोन विवाहित मोठ्या बहिणी भावाच्या लग्नासाठी घरी आल्या होत्या. आज मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. शहरातील रस्त्यांवर व बाजारात फिरणाऱ्या अशा भटक्या जनावरांमुळे यापूर्वी देखील अनेक अपघात घडले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"