250 दलित कुटुंबं स्विकारणार इस्लाम ?
By admin | Published: July 28, 2016 10:19 AM2016-07-28T10:19:40+5:302016-07-28T12:27:27+5:30
तामिळनाडूमधील पझंगकल्लीमेडू आणि नागापल्ली गावातील 250 दलित कुटुंबांनी मंदिरात प्रवेश मिळत नसल्याने इस्लाम धर्म स्विकारण्याच्या निर्णय घेतला आहे
Next
ऑनलाइन लोकमत -
चेन्नई, दि. 28 - मंदिरात प्रवेश देत नसल्याने 250 दलित कुटुंबं इस्लाम धर्म स्विकारण्याच्या तयारीत आहेत. तामिळनाडूमधील पझंगकल्लीमेडू आणि नागापल्ली गावातील हे कुटंबं आहेत. गावातील काही कुटुंबांनी तर इस्लाममध्ये धर्मातरणही केलं आहे.
पझंगकल्लीमेडू गावात एकूण 180 दलित कुटुंबं राहतात. मंदिरात 5 दिवस चालणा-या उत्सवात आम्हाला एक दिवस सर्व विधी करायला मिळावेत अशी त्यांची इच्छा होची. मात्र हिंदू धर्मियांनी नकार दिल्याने त्यांना परवानगी मिळाली नाही. ज्यामुळे दलित कुटुंबं नाराज आहेत, आणि त्यांनी इस्लाम धर्म स्विकारण्याचा गावातील 6 कुटुंबानी अगोदरच इस्लाममध्ये धर्मातरण केलं आहे.
तामिळनाडू तौहीद जमात संघटनेने गावक-यांमध्ये कुरानची प्रत वाटण्यास सुरुवात केली असल्याची माहिती एका गावक-याने दिली आहे. तर ख्रिश्चन मिशनरीनेही ग्रामस्थांशी संपर्क साधला आहे. काही हिंदू संघटनांनीदेखील या दलित कुटुंबांशी संपर्क साधला असून हे पाऊल न उचलण्यातं आवाहन केलं आहे. तसंच दलित आणि हिंदूंमध्ये समेट घडवून आणण्याचाही प्रयत्न करत आहेत.
पझंगकल्लीमेडू हे समुद्री किना-यावर वसलेलं एक गाव आहे. गावात एकूण 400 कुटुंबं राहतात ज्यांच्यातील 180 दलित आहेत. पझंगकल्लीमेडूपासून 240 किमीवर असलेल्या नागापल्ली गावातही दलितांशी भेदभाव झाल्याचं समोर आलं आहे. गावातील 70 कुटुंबांनी मंदिरात प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत धर्मांतरण करण्याचा शेवटचा मार्ग स्विकारला आहे. सरकार आणि प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप गावक-यांनी केला आहे. 'अनेक दिवस झाले आम्ही विनंती करत आहोत मात्र आम्हाला आमचे अधिकार मिळवून देण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचं', स्थानिकाने सांगितलं आहे.
TN: Dalit families who were denied permission to attend temple festival in Karur,also threatened to convert to Islam pic.twitter.com/K8ZDTXvHPZ
— ANI (@ANI_news) July 28, 2016
If such discrimination continues then we will be forced to convert to Islam,no one addressing our problems:Geeta pic.twitter.com/zCNaIHSp1f
— ANI (@ANI_news) July 28, 2016