खोर परिसरात लावली २५० झाडे
By admin | Published: October 30, 2016 10:46 PM2016-10-30T22:46:25+5:302016-10-30T22:46:25+5:30
शशांक फाउंडेशनचा उपक्रम : राहुल कुल यांच्या हस्ते वृक्षारोपण
Next
श ांक फाउंडेशनचा उपक्रम : राहुल कुल यांच्या हस्ते वृक्षारोपणखोर : येथे शशांक फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. आमदार राहुल कुल यांच्या हस्ते खोर ग्रामपंचायत व श्री भैरवनाथ विद्यालयासमोरील प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. कै. शंशाक चौधरी यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांचे बंधू विकास चौधरी व वडील पोपट चौधरी यांनी खोरमध्ये शशांक फाउंडेशनची निर्मिती केली. शशांक फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे, गाव परिसरामध्ये वृक्षारोपण करणे, असे उपक्रम सुरू करण्यात आले. खोर ग्रामपंचायत व श्री भैरवनाथ विद्यालयासमोरील प्रांगणामध्ये तब्बल २५० विविध प्रकारच्या झाडांची या वेळी लागवड करण्यात आली. भविष्यात लवकरच वयोवृद्धांसाठी बगीचा तयार करून एक प्रकारचे करमणुकीचे उद्यान बनविण्याचा शशांक फाउंडेशनचा मानस आहे. वृक्षसंवर्धन, मातीखड्डे, स्टील जाळ्या, लाकडी जाळ्या, ठिबक सिंचन, पाइपलाइन करण्यात आले आहे. फाउंडेशनने दहावीमध्ये प्रथम तीन क्रमांक येणार्या विद्यार्थ्यांसाठी व गोर-गरीब विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशीप या सर्व बाबींसाठी एकूण १ लाख १० हजार रुपये इतका खर्च केला असल्याचे फाउंडेशनचे अध्यक्ष विकास चौधरी यांनी सांगितले आहे. या वृक्षारोपणप्रसंगी भीमा-पाटसचे संचालक विकास शेलार, तुकाराम ताकवणे, रामदास दोरगे, पांडुरंग डोंबे, शशांक फाउंडेशनचे अध्यक्ष विकास चौधरी व पोपट चौधरी, गणेश साळुंके, सुहास चौधरी, दिलीप डोंबे, विजय कुदळे, शिवाजी पिसे, संजय चौधरी, राहुल चौधरी, सुभाष चौधरी, दत्तात्रय शिंदे, पांडुरंग चौधरी, अनिल चौधरी, विकास चौधरी, भानुदास डोंबे , आदित्य डोंबे, तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.फोटोओळ : खोर (ता. दौंड) येथे शशांक फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण करताना आमदार राहुल कुल.