पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटी योजनेची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 11:37 PM2023-06-13T23:37:43+5:302023-06-13T23:37:59+5:30

अमित शाह यांनी देशभरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी ८००० कोटींहून अधिक किमतीच्या तीन महत्वपूर्ण योजना जाहीर केल्या.

2500 crore scheme announced for 7 cities including Mumbai, Pune to reduce flood risk by Amit Shah | पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटी योजनेची घोषणा

पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटी योजनेची घोषणा

googlenewsNext

नवी दिल्ली - देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या मुंबई, पुण्यासह ७ शहरांमध्ये पुराचा धोका कमी करण्यासाठी २५०० कोटी रूपयांचे प्रकल्प उभारले जाणार असल्याची महत्वाची घोषणा केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी केली. विज्ञान भवनात केंद्रीय गृह मंत्री शाह यांच्या अध्यक्षतेत आपत्ती व्यवस्थापनाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत शाह यांनी ही घोषणा केली. 

या बैठकीस राज्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असिम कुमार गुप्ता हे उपस्थित होते.  यामध्ये मुंबई, पुणे यांच्यासह चेन्नई, कोलकाता बेंगळुरू, हैदराबाद, अहमदाबाद या सात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा समावेश असल्याची माहिती शाह यांनी यावेळी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजन २०४७ अंतर्गत भारताला आपत्ती प्रतिरोधक बनवण्यासाठी तसेच देशातील आपत्ती जोखीम कमी करण्याची आपत्ती व्यवस्थापनाची प्रणाली अधिक मजबूत करणे आणि आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित विविध मुद्द्यांवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करणे हा या बैठकीचा आयोजनामागील उद्देश होता. 

अमित शाह यांनी देशभरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी ८००० कोटींहून अधिक किमतीच्या तीन महत्वपूर्ण योजना जाहीर केल्या. यामध्ये राज्यांमध्ये अग्निशमन सेवांचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी ५००० कोटींचे प्रकल्प उभारले जातील. शहरांमधील पुराचा धोका कमी करण्यासाठी सात सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांसाठी २५०० कोटींचे प्रकल्प उभारले  जातील तसेच भूस्खलन शमन करण्यासाठी १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ८२५ कोटी रूपयांची राष्ट्रीय भूस्खलन जोखीम शमन असे महत्वाचे  प्रकल्प उभारले जाणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. 

३५० अती जोखमी आपत्ती प्रवण जिल्ह्यांमध्ये सुमारे एक लाख युवा आपदा मित्र (स्वयंसेवक) तयार करण्याचे लक्ष्य निश्चित केले असल्‍याची माहिती बैठकीत दिली. यामुळे आपत्ती उदभल्यास त्यातून जलदरित्या बाहेर निघता येईल. राज्यात या पद्धतीचे प्रशिक्ष‍ित आपदा मित्र आठ हजाराच्यावर आहेत. महाराष्ट्र राज्य असे पहिले राज्य आहे ज्यांनी प्रशिक्षित आपदा मित्र अशी संकल्पना राबवून प्रत्यक्ष अंमलबजावणी केली.

Web Title: 2500 crore scheme announced for 7 cities including Mumbai, Pune to reduce flood risk by Amit Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.